मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray Meet Eknath Shinde : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर घेतली भेट

• Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde at Varsha Bungalow मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निवडणुकीबाबत चर्चा?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray Meet Eknath Shinde : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर घेतली भेट

• Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde at Varsha Bungalow मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निवडणुकीबाबत चर्चा?

मुंबई :- राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली असतानाच राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांना टक्कर देण्यासाठी राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. अशातच स्वबळावर निवडणुकीचा नारा देणारे राज ठाकरे महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र निर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा Raj Thackeray Meet Eknath Shinde या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटी मागील काय कारण आहे अद्यापही समोर आले नाही. परंतु राज ठाकरे महायुतीत सामील होणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

राज ठाकरे यांनी रविवारी (22 सप्टेंबर) शिवसेना (ठाकरे) युवा सेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली आहे. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या मतदारसंघावर यापूर्वीच मनसेने दावा ठोकला असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तयारीलाही लागले आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट Raj Thackeray Meet Eknath Shinde महत्वाची मानली जाते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जर राज ठाकरे महायुतीत सहभागी झाल्यास राज्यात राजकीय वेगळे समीकरण पाहायला मिळेल.

हेही वाचा: Panvel Crime News | पनवेल : गोर गरीब मुलींना वेश्याव्यवसायात ओढणारा दलाल जेरबंद : 'पिटा' अंतर्गत कारवाई

शेअर करा