मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai news : कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’; राज ठाकरेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?

Mumbai news : मुंबई : “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’; राज ठाकरेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’; राज ठाकरेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?


Mumbai news : मुंबई :
“कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच!” मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या एका वाक्याच्या सोशल मीडिया पोस्टने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कोणाचेही नाव न घेता राज ठाकरे यांनी केलेल्या या सूचक विधानाचा रोख नेमका कुणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

दरम्यान, दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सीबीआयने या प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या जबाबात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नावे घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सीबीआयच्या FIRमध्ये या दोन्ही नेत्यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत


दिशा सालियान यांच्या मृत्यूभोवती गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप होत आले आहेत. मात्र, तपास यंत्रणेच्या FIRमध्ये त्यांचा थेट आरोपी म्हणून उल्लेख नसल्याने या प्रकरणावरून पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी न्यायालयानेही या प्रकरणातील तपासाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते.

भाजप नेते नितेश राणे यांच्याकडूनही दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा राजकीय रंग मिळाला आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढल्याचा दावा केला जात असतानाच राज ठाकरे यांच्या सूचक पोस्टने या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे.

राज ठाकरेंची एका वाक्याची पोस्ट चर्चेत
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली आहे.

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच!”

या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाचा नेमका संदर्भ काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते, सध्या सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हे सूचक विधान केले असावे.

फडणवीस-शहांच्या वक्तव्याला टोला?


दरम्यान, राज ठाकरेंच्या या पोस्टचा संबंध केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील वक्तव्यांशीही जोडला जात आहे. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात अमित शाह यांनी महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य असल्याचा मुद्दा मांडला होता.

त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मराठी भाषा माझी आई आहे, तर हिंदी भाषा माझी मावशी आहे,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरूनही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगली होती.

त्यामुळे राज ठाकरेंच्या “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते” या पोस्टचा रोख दिशा सालियान प्रकरणातील राजकीय आरोपांकडे आहे की अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषाविषयक वक्तव्यांकडे, याबाबत आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी मात्र आपल्या पोस्टमधून नेमका इशारा कुणाला केला, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा