मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत रद्द!

Raj Thackeray Latest News : देशाने एकजुटीने आणि भारतीय सैन्य आणि सीमा भागातील लोकांच्या पाठी उभे राहिले पाहिजे ; राज ठाकरे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray On Uddhav Thackeray

Raj Thackeray Latest News : देशाने एकजुटीने आणि भारतीय सैन्य आणि सीमा भागातील लोकांच्या पाठी उभे राहिले पाहिजे ; राज ठाकरे

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 'मुंबई तक' या डिजिटल वृत्तवाहिनीला शनिवारी 10 मे रोजी मुलाकात देणार होते परंतु सध्या देशात भारत आणि पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीमुळे ही मुलाखत उचित ठरणार नाही Raj Thackeray Latest News त्यामुळे राज ठाकरे यांनी पोस्ट करत हे मुलाखत रद्द करण्याचे आणि पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. सध्या देशातील सैन्य सीमा भागातील भारतीय नागरिकांशी एकजूटी उभे राहणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की,येत्या शनिवारी 10 मे ला पुण्यात 'मुंबई तक' ही डिजिटल वृत्तवाहिनी माझी विशेष मुलाखत घेणार होते. पण जेंव्हा देशांच्या सीमांवर कमालीचा ताण तणाव असताना, मुलाखत, गप्पा अशासारखे कार्यक्रम करणं उचित नाही असं माझं मत आहे. त्यामुळे मी ही भावना 'मुंबई तक' च्या संपादकीय टीमला कळवली आणि त्यांनी देखील या भावनेचा उचित सन्मान करत ही मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की,या काळात सर्व देशाने एकजूट असणं आणि भारतीय सैन्य आणि सीमाभागातील भारतीय नागरिकांच्या सोबत असणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हेच महत्वाचं आहे.
त्यामुळे ही मुलाखत रद्द झाल्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी ही विनंती… बाकी सगळ्या विषयांवर नंतर सविस्तर बोलूच… अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी ही मुलाखत रद्द करण्याचे घोषित केले आहे.

शेअर करा