मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : "मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव; मळमळ पुन्हा बाहेर ओकली!"

Raj Thackeray On Jitendra Shah : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या 'बॉम्बे' विधानावर राज ठाकरे आक्रमक; "तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय," मराठी माणसाला जागे होण्याचे आवाहन!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Raj Thackeray : "मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव; मळमळ पुन्हा बाहेर ओकली!"

Raj Thackeray On Jitendra Shah : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या 'बॉम्बे' विधानावर राज ठाकरे आक्रमक; "तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय," मराठी माणसाला जागे होण्याचे आवाहन!

मुंबई :- आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. "मला आयआयटी बॉम्बेचं (IIT Bombay) नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा आनंद आहे," असे विधान सिंह यांनी केले होते.

जितेंद्र सिंह यांच्या या विधानाचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत खरमरीत शब्दांत समाचार घेतला आहे. त्यांनी थेट केंद्राच्या मानसिकतेवरच निशाणा साधला आहे.

सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक

राज ठाकरे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जितेंद्र सिंह यांचे विधान हे "सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे" हे स्पष्टपणे दिसत आहे.

"मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे!"

जितेंद्र सिंह यांचा मुंबई किंवा महाराष्ट्राशी थेट संबंध नसतानाही, त्यांनी असे विधान करणे म्हणजे "आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे" हाच त्यांचा उद्देश असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

'मुंबई' नाव खटकण्यामागे काय कारण?

राज ठाकरे यांनी या निमित्ताने एमएमआर परिसरात राहणाऱ्या मराठी जनांना "आता तरी डोळे उघडा" असे आवाहन केले आहे. 'मुंबई' हे नाव मराठी माणसाच्या मुंबा आईच्या (मूळची देवी) नावावरून घेतले आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. "तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय," अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव?

राज ठाकरे यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा गंभीर डाव शिजत असल्याची शक्यता वर्तवली आहे.

"असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार. 'मुंबई' नको, 'बॉम्बे'च हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. तेव्हा मराठी माणसा जागा हो!"

राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघात करत, इथे आधीच केंद्रीय हस्तक, उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केले आहे, हे आपण रोज पाहत आहोत, असे नमूद करत मराठी माणसाला भावनिक साद घातली आहे.

शेअर करा