मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

राजभवन मार्ग विस्तारीकरणाला गती: नगरसेवक सनी निम्हण

विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्प प्रलंबित राहिला

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

राजभवन मार्ग विस्तारीकरणाला गती: नगरसेवक सनी निम्हण

विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्प प्रलंबित राहिला

निलेश राऊत
पुणे: पाषाण–औंध परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या राजभवन रोड (लोकभवन मार्ग) विस्तारीकरण प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून, या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. आमदार सिद्धार्थ शिरोळे व उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत कामाची सुरुवात नुकतीच झाली.

या मार्गाच्या मधोमध असलेल्या पोलीस विभागाच्या काही हेरिटेज वास्तूंमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. आवश्यक परवानग्या उपलब्ध असूनही विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्प प्रलंबित राहिला होता. याबाबत नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सातत्याने पाठपुरावा करत अतिरिक्त आयुक्त दिवटे यांची भेट घेऊन अडथळ्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली होती.

कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने नागरिकांना दिलासा
या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने संबंधित पोलीस इमारतींचे स्थलांतर व हटविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया रावबून कामाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राजभवन (लोकभवन) मार्ग हा पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक तसेच व्हीआयपींची ये-जा होत असते. त्यामुळे या रस्त्याच्या विस्तारीकरणामुळे औंध–पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, ब्रेमेन चौक ते औंध राजीव गांधी पूल दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पालाही या निर्णयामुळे गती मिळणार असून, संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.

या वेळी नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड तसेच हेरिटेज विभागाचे, भवन विभागाचे, पथ व मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा