Pune News : पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे १७ दिवसांचे आंदोलन स्थगित
Pune News : पुणे: मांजरी येथे गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण आणि आंदोलन अखर स्थगित करण्यात आले.
1 मिनिट वाचन

Pune News : मुख्यमंत्र्यांसोबतच्या सकारात्मक बैठकीनंतर १४ मागण्या मान्य

Pune News : पुणे: मांजरी येथे गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण आणि आंदोलन अखर स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या चौदा प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. सरकारने दोन नवे शासन निर्णय (जीआर) जारी केले असून, उर्वरित मागण्यांसाठी नव्वद दिवसांत कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासन दिले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यासाठी नव्वद दिवसांत कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना हॉटेलमधून जेवण देण्याऐवजी थेट मेस सुविधा सुरू करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला. https://maharashtramirror.com/ Pune News
बोगस आदिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळविणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. त्याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी असलेले वयोमर्यादेचे नियम शिथिल करण्याचेही सरकारने मान्य केले आहे.
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मांजरी येथील आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडवले. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी वेळेत झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व निवासी सुविधांमध्ये मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




