Pune RTO News : दिवे येथे स्कूल बस फिटनेस नूतनीकरण सुरू राहणार
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपक्रम
1 मिनिट वाचन

Pune RTO News : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपक्रम

Pune RTO News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पुणे द्वारे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि वाहनचालक व मालकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दि.२२ आणि २३ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी मौजे दिवे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) नूतनीकरणाचे कामकाज पूर्णपणे सुरू राहील. https://maharashtramirror.com/ Pune RTO News
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना—विशेषतः स्कूल बस आणि व्हॅन यांना या प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. सुट्टीच्या दिवशी हे कार्यालय सुरू राहिल्यामुळे स्कूल बस चालक व मालकांना विनाअडथळा आणि सोयीस्करपणे आपल्या वाहनांची तपासणी करून घेता येईल.https://maharashtramirror.com/
आरटीओ प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व स्कूल बस व व्हॅनचे चालक, मालक आणि संबंधित संघटनांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली वाहने तपासणीसाठी मौजे दिवे येथील कार्यालयात वेळेवर सादर करावीत. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित राहावा आणि वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र अपडेट राहावे, या उद्देशाने प्रशासनाकडून हा विशेष निर्णय घेण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Pune RTO News




