मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Porsche Accident : मुजोर विशाल, सुरेंद्रनाथ अग्रवाल बिल्डरच्या अडचणी वाढल्या : चालकाला डांबून अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल : पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडून कठोर कारवाई

गुन्हे शाखा उपायुक्त अमोल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरेंद्रनाथ अग्रवाल याला अटक विशाल अग्रवाल याच्या अडचणीत वाढ

M
mubarak

1 मिनिट वाचन

Pune Porsche Accident : मुजोर विशाल, सुरेंद्रनाथ अग्रवाल बिल्डरच्या अडचणी वाढल्या : चालकाला डांबून अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल : पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडून कठोर कारवाई

  • गुन्हे शाखा उपायुक्त अमोल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरेंद्रनाथ अग्रवाल याला अटक
  • विशाल अग्रवाल याच्या अडचणीत वाढ
  • पुणे, दि. 25 मे, महाराष्ट्र मिरर : मुबारक जिनेरी Pune Porsche Accident

    कल्याणीनगर Pune Porsche Accident अपघातात आरोपी असलेल्या विधीसंघर्षित याला वाचवण्यासाठी चालकाला डांबून ठेवून अपहरण केल्या प्रकरणी सुरेंद्र कुमार अग्रवाल व विशाल अग्रवाल यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार CP Amitesh Kumar यांनी मुजोर बिल्डर पिता पूत्रावर कडक कारवाई करत पुणेकर जनतेमध्ये पोलीस Pune Police दलाविषयी विश्वास निर्माण केला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी चालक, गंगाधर शिवराज हेरीक्रुब, वय 42 वर्ष, रा.पुणे याने तक्रार दिल्यावरून आरोपी 1.सुरेंद्र अग्रवाल रा. वडगावशेरी पुणे, 2.विशाल अग्रवाल रा. वडगावशेरी पुणे यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात कलम:- 322/2024 भा.दं.वि.कलम 342, 365, 368, 506, 34. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यातील आरोपी विशाल अग्रवाल हा दुसऱ्या गुन्ह्यात अटक आहे तर सुरेंद्र अगरवाल याला आज गुन्हे शाखेकडून सकाळी अटक करण्यात आली.

    चालक यांनी फिर्याद दिली की, दिनांक 19/05/2024 रोजी रात्रौ ते दिनांक 20/05/2024 रोजी दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन येथुन मी माझे घरी जात असताना सुरेंद्र आगरवाल सरांनी मला येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी मला त्याचेकडे बोलावुन घेवुन धमकी देवुन माझ्या इच्छेविरुध्द त्यांचेकडील बीएमडब्ल्यु गाडीमध्ये बसवुन, ब्राम्हा सनसिटी येथील त्यांचे बंगल्यात आणुन, सुरेंद्र आगरवाल सर व विशाल आगरवाल सर यांनी आपआपसात संगणमत करुन मला धमकावुन माझा मोबाईल फोन काढुन घेवुन त्यांच्या बंगल्यामध्ये बेकायदेशीर लपवुन ठेवण्याच्या उददेशाने डांबुन ठेवून धमकाविले कीं त्यांच्या मुलाने केलेला गुन्हा स्वतः वर घे व “ त्या बाबतीत कोणाशी बोललास तर याद राख ” अशी धमकी दिली.

    शेअर करा