मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : वसईत चोरांचा 'रिक्षा रॅकेट' उद्धवस्त! गुन्हे शाखेची थरारक कारवाई; 4 चोरीच्या रिक्षा एका सराईताकडून जप्त

•भायखळ्यापासून वसईपर्यंत रिक्षा चोरीचं जाळं!

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Crime News : वसईत चोरांचा 'रिक्षा रॅकेट' उद्धवस्त! गुन्हे शाखेची थरारक कारवाई; 4 चोरीच्या रिक्षा एका सराईताकडून जप्त

•भायखळ्यापासून वसईपर्यंत रिक्षा चोरीचं जाळं! एकट्याचं 3.40 लाखांचा गुन्हेगारी इतिहास

वसई | मुंबई आणि उपनगरांमध्ये थैमान घालणाऱ्या रिक्षा चोरी रॅकेटचा भंडाफोड करत गुन्हे शाखा कक्ष-2 वसईने एक मोठं यश मिळवलं आहे. या धडक कारवाईत दोन सराईत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, 7 चोरीच्या रिक्षा हस्तगत करून तब्बल 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपीने वाहन चोरीचा 7 गुन्ह्यांचा कबुलीजबाब दिला आहे.

ही कारवाई सुरू झाली एका साध्या तक्रारीपासून — कुर्ल्यातील रिक्षाचालक मदन यादव यांनी 14 जून रोजी आपली रिक्षा वसईतील फादरवाडी नाक्याजवळ पार्क केली होती. काही वेळातच रिक्षा गायब! तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली, पण यामागे कायद्याला थट्टा समजणारा एक गुन्हेगारी डाव लपलेला होता.

पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, पुरावे आणि गुन्हेगारी पद्धतींचा अभ्यास करत इक़्बाल उर्फ अकबाल अजिज खान (57 वय, भायखळा) या जुन्या 'खतरनाक' आरोपीवर लक्ष केंद्रीत केले. त्याच्या जोडीदारासह त्याला 16 जून रोजी अटक करण्यात आली.सव्यदअली बकरीद्दिन नाई (वय 35, रा. नालासोपारा पूर्व) यांना अटक केली.

आरोपी इक़्बालने चौकशीत 'सात रिक्षा चोरी'चं धक्कादायक कबूल केलं! तपासात असंही उघड झालं की त्याने भायखळ्यापासून नालासोपारा आणि वसईपर्यंत रिक्षा चोरण्याचं जाळं पसरवलं होतं. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सर्व रिक्षा ताब्यात घेतल्या आणि वाहनचोरांच्या टोळीवर मजबूत कारवाई केली.

आरोपी इक़्बालने चौकशीत 'सात रिक्षा चोरी'चं धक्कादायक कबूल केलं! तपासात असंही उघड झालं की त्याने भायखळ्यापासून नालासोपारा आणि वसईपर्यंत रिक्षा चोरण्याचं जाळं पसरवलं होतं. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सर्व रिक्षा ताब्यात घेतल्या आणि वाहनचोरांच्या टोळीवर मजबूत कारवाई केली.

या चोऱ्यांचा मागोवा घेत पोलीस आता या रॅकेटच्या इतर सूत्रधारांचा शोध घेत आहेत. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून वाहन चोऱ्यांना रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे, आणि ही कारवाई त्याचाच भाग होती.

पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ, पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, सहाय्यक फौजदार संजय नवले, मुकेश पवार, चंदन मोरे, रविंद्र पवार, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहुल कर्पे, पोलीस नाईक प्रशांतकुमार ठाकुर, पोलीस अंमलदार अनिल साबळे, राजकुमार गायकवाड, प्रतिक गोडगे, अविनाश चौधरी, गुन्हे शाखा-2 वसई, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण (सायबर पोलीस ठाणे) सायबर पोलीस ठाणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे

हेही वाचा: Mumbai Crime News : अभिनेत्री व्हायचं होतं… आणि जाळ्यात अडकली!

शेअर करा