मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Police News | पुणे पोलिसांकडून दसरा भेट : गहाळ मोबाईल नागरिकांना मिळाले परत

गुन्हे शाखेच्या युनिट-३ कडून १० मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune police news

  • गुन्हे शाखेच्या युनिट-३ कडून १० मोबाईल तक्रारदारांना सुपूर्द
  • पुणे, दि. १२ ऑक्टोबर, मुबारक जिनेरी
    महाराष्ट्र मिरर

    Pune Police News | साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसरा अर्थातच विजयादशमी दिवशी पुणे पोलिसांनी नागरिकांना खुश करणारी भेट दिली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-३ कडून गहाळ मोबाईलचा शोध घेत तब्बल १० तक्रारदारांना ऐन दसऱ्या दिवशीच मोबाईल भेट देण्यात आली आहे.

    गुन्हे शाखा, युनिट-३ कडील TAW चे काम पाहणारे पोलीस हवालदार संजीव कळंबे यांनी CEIR या पोर्टलवरून परिमंडळ 3 कडील पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले मोबाईल यांची माहिती घेतली.. ते मोबाईल पोर्टलवर चालू असलेल्या बाबत दिसल्याने त्यांचे मोबाईल एस डी आर काढले. सदरचे मोबाईल हे सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यात चालू होते,. संबंधित वापरत्या व्यक्तींना सदरचे मोबाईल हे गहाळ झालेले आहेत त्याबाबत तक्रार दाखल असून ते जमा करा असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्याकडून सदरचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. Pune Police News

    मोबाईल खालील फिर्यादी यांना ताब्यात देण्यात आले

    १) दिपाली निशिकांत मोकाशी
    २) प्रतीक अनिल शेटे
    ३) विकास तुळशीराम चोरगे
    ४) संध्या शिवाजी पाटील
    ५) शुभम सुभाष शितोळे
    ६) योगेश विक्रम कसबे
    ७) राज यशवंत हरियण
    ८) आकाश अरविंद लांडे
    ९) श्वेता सिंग
    १०) पूजा कासार.

    सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-३ चे वपोनि रंगराव पवार, पोलीस अंमलदार संजीव कळंबे, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, इसाक पठाण व सुजित पवार यांचे पथकाने केली आहे..

    हेही वाचा: ACB Trap Ravet | रावेत : लाचखोर पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

    शेअर करा