मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune police news | दोन वर्षापासून महिलेची तक्रार दूर्लक्षित : या पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याचा मनमानी कारभार ...

दोन वर्षापासून महिलेची तक्रार दूर्लक्षित : या पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याचा मनमानी कारभार ...

M
mubarak

1 मिनिट वाचन

Pune police news | दोन वर्षापासून महिलेची तक्रार दूर्लक्षित : या पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याचा मनमानी कारभार ...

दोन वर्षापासून महिलेची तक्रार दूर्लक्षित : या पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याचा मनमानी कारभार ...

  • पोलीस आयुक्त लक्ष देतील काय ?
  • पुणे, दि. 6 मार्च, (मुबारक जिनेरी) महाराष्ट्र मिरर :

    दोन वर्षापासून पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवून तक्रार दाखल होत नसल्याने अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. परिमंडळ 5 हद्दीतील वानवाडी पोलीस ठाणे येथे गेल्या दोन वर्षांपासून अर्ज प्रलंबित ठेवून महिलेशी उद्धट वर्तन व त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. Pune police news

    पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कामाची धमक पाहून महिलेला न्याय मिळण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.तक्रारदार महिला फिलोमिना चाऊस यांची हॉटेल व्यवसायात गुंतवणूकीचे आमिष दाखवून सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सन २०२२ मध्ये एका ईसमाने चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सदर महिलेकडून वेळोवेळी सुमारे ३५ लाख रुपये गुंतवणूकीसाठी घेतले. गुंतवणूकीवर परतावा मागितला असता सदर इसमाने आज देतो उद्या देतो असे सांगून टाळाटळ केली व रकमेसह पश्चिम बंगाल येथे पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    तक्रार प्राप्त झालेनंतर वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक यांनी मनमानी पद्धतीने अर्ज प्रलंबित ठेवून, महिलेस उद्धट वागणूक देत न्याया पासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

    शेअर करा