Pune crime : ज्येष्ठ महिलेची ७४ हजारांची सोन्याची बांगडी लांबवली
Pune crime : पुणे: पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या एका ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबवली आहे.
1 मिनिट वाचन

Pune crime : स्वारगेट ते जांभूळवाडी पीएमटी बस प्रवास
Pune crime : पुणे: पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या एका ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबवली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:१० ते ३:३० वाजेच्या दरम्यान फिर्यादी महिला स्वारगेट ते जांभूळवाडी दरम्यान धावणाऱ्या २९० क्रमांकाच्या पीएमटी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा किंवा महिलेचे लक्ष नसल्याचा फायदा घेतला.https://maharashtramirror.com/ Pune crime
चोरट्याने अतिशय शिताफीने महिलेच्या हातातील ७४ हजार ९८० रुपये किमतीची सोन्याची बांगडी सरकवून पोबारा केला. प्रवासादरम्यान हा प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सहकारनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (क) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण पवार या चोरीच्या प्रकरणाचा तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/




