मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE NEWS : वृक्ष संवर्धनासाठी सात नगरसेवकांची निवड

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS : महापालिकेकडून शहरातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या वृक्ष संरक्षण आणि संवर्धन प्राधिकरण समितीवर सात नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे.PUNE NEWS

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

PUNE NEWS : वृक्ष संवर्धनासाठी सात नगरसेवकांची निवड

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS : महापालिकेकडून शहरातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या वृक्ष संरक्षण आणि संवर्धन प्राधिकरण समितीवर सात नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे.PUNE NEWS

महापालिकेत मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये वृक्ष संरक्षण व संवर्धन प्राधिकरण समितीच्या सदस्यपदी नगरसेवकांची निवड करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये नगरसेवक शैलजित बनसोडे, विशाल मलके, नगरसेविका रूपाली पवार, कोमल नवले, स्नेहा कांबळे, उज्ज्वला जंगले, अंजली ओरसे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. या समितीमध्ये १५ सदस्य आहेत. त्यामध्ये महापालिका आयुक्त, सात लोकप्रतिनिधी व सात स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींचा समावेश आहे.PUNE NEWS

शहरातील वृक्षांचे संवर्धन करण्याऐवजी विविध प्रकल्पांसाठी हजारो वृक्षांची कत्तल करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयामुळे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर, सर्वसाधारण सभेमध्ये वृक्ष प्राधिकरण समितीसाठी सात नगरसेवकांची सदस्यपदी निवड करण्यात आली.PUNE NEWS

मागील महापालिकेची मुदत १४ मार्च २०२२ मध्ये संपल्याने तत्कालीन वृक्ष संवर्धन समिती बरखास्त करण्यात आली होती. दरम्यान, महापालिका आयुक्तांवर या समितीची जबाबदारी आली होती. याच कालावधीत शहरातील वृक्ष संवर्धनास बळ देण्याऐवजी हजारो वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यावरून शहरातील पर्यावरण प्रेमी, पर्यावरण तज्ज्ञांकडून महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित समितीच्या सदस्यपदी नगरसेवकांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिक व विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्यानुसार ही निवड करण्यात आली.PUNE NEWS

ताराचंद रूग्णालयाच्या नियामक मंडळावर नगरसेवक नियुक्त

रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीक रुग्णालयाच्या नियामक मंडळावर महापालिकेच्या चार नगरसेवकांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सभागृहनेते गणेश बिडकर, नगरसेवक तेवेंद्र वडके, नगरसेविका कल्पना बहिरट आणि नगरसेविका अर्चना यादव यांची निवड करण्यात आली आहे.

PUNE NEWS

शेअर करा