मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : अधिकारी गेले अन् काही तासांतच पुन्हा सांडपाणी रस्त्यावर

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

3 मिनिट वाचन

Pune News

Pune News : ‘आश्वासन नको, कायमचा तोडगा द्या’; हॉटेलवर कारवाईची स्थानिकांची मागणी

पुणे, महाराष्ट्र मिरर

Pune News : ‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा मारणाऱ्या पुणे महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार हडपसर भागातील सय्यद नगर-महंमदवाडी रस्त्यावर उघडा पडला आहे. येथील एका हॉटेलसमोर गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार ड्रेनेज तुंबण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक नागरिकांनी शेकडो वेळा तक्रारी केल्या, प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केले, तरीही महापालिका प्रशासन ढिम्म हललेले नाही. काल महापालिकेची यंत्रणा आली, त्यांनी जुजबी काम केले आणि अधिकारी निघून गेले. मात्र, अधिकारी पाठ फिरवताच काही तासांत व पुन्हा ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. "आता आम्हाला महापालिकेची तात्पुरती आश्वासने आणि मलमपट्टी नको, तर कायमचा तोडगा द्या," असा अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशी करत आहेत. ( Pune News sayyad nagar drainage overflow )

Crime : पालखी सोहळ्यात दागिने पळवणारी महिला टोळी जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात

सय्यद नगर आणि महंमदवाडी जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावर शाळा आणि निवासी सोसायट्या आहेत. दररोज सकाळी शेकडो लहान विद्यार्थ्यांना याच दुर्गंधीयुक्त आणि मानवी विष्ठामिश्रित सांडपाण्यातून वाट काढत शाळा गाठावी लागते. अनेकदा वाहनांच्या चाकांमुळे हे घाण पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर उडते. गेल्या काही दिवसांपासून या भागात उग्र दुर्गंधी पसरली असून, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली असून, याला सर्वस्वी महापालिका जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ( Pune News )

प्रशासकीय औपचारिकता आणि संताप

शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांच्या वाढत्या दबावानंतर महापालिकेचे कर्मचारी, ड्रेनेज साफ करणारी सक्शन व्हॅन आणि कनिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी काही वेळ मशीन लावून चेंबर साफ केले आणि "समस्या दूर झाली आहे," असा दावा करत तिथून काढता पाय घेतला. मात्र, दुपार होण्याची वाट न पाहता त्याच चेंबरमधून पुन्हा लाखो लिटर घाण पाणी रस्त्यावर वाहू लागले. महापालिकेने केवळ नागरिकांचा रोष शांत करण्यासाठी कामाची 'औपचारिकता' पूर्ण केली का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ( Pune News )

हॉटेलवर मेहेरनजर का?

या संपूर्ण समस्येच्या मुळाशी रस्त्यालगत असलेले एक मोठे हॉटेल असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या हॉटेलमधील अन्नपदार्थांचे अवशेष, कचरा आणि मैला पाणी थेट सार्वजनिक ड्रेनेज लाईनमध्ये बेकायदेशीरपणे सोडले जाते. हॉटेलच्या कचऱ्यामुळे आणि तेलकट पदार्थांमुळे ड्रेनेज लाईन ब्लॉक होते, असा दावा नागरिकांनी केला आहे. अनेकदा तक्रारी करूनही महापालिका या हॉटेलवर कडक कारवाई का करत नाही? प्रशासनाची या हॉटेल चालकावर मेहेरनजर का? अशी शंका आता उपस्थित केली जात असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. ( Pune News )

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

तसेच, निवडणुका जवळ आल्या की विकासाच्या लांबच लांब बाता मारणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आजी-माजी नगरसेवक आता या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. "आमचे लोकप्रतिनिधी जमिनीवर काम करण्यापेक्षा सोशल मीडियावर रील आणि पोस्ट टाकण्यात जास्त व्यस्त असतात. त्यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या दुनियेतून बाहेर पडून नागरिकांच्या या नरकयातना पाहाव्यात," अशा शब्दांत नागरिकांनी लोकप्रतिनिधींवर घणाघाती टीका केली. ( Pune News )

अशातच काल शुक्रवार असल्याने परिसरातील शेकडो बांधव नमाज पठणासाठी मशिदीकडे जात होते. अत्यंत पवित्र आणि स्वच्छ राहून मशिदीत जाणाऱ्या या भाविकांना रस्त्यावरील या घाण सांडपाण्यातूनच पायपीट करावी लागली. यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून, प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Moshi Building Collapse : त्या इमारतीचे दोन मजले अनधिकृत ?

आम्ही दरवर्षी नियमित कर भरतो. मग आम्हाला या नरकात राहण्याची शिक्षा का? महापालिकेने तात्पुरती यंत्रणा पाठवून आमची थट्टा थांबवावी. या ड्रेनेज समस्येवर जोपर्यंत नवीन लाईन टाकून कायमस्वरूपी तोडगा निघत नाही आणि संबंधित हॉटेलवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

  • स्थानिक रहिवासी, सय्यद नगर
  • शेअर करा