मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : गांधीजींचा अपमान! पुण्यात मध्यरात्री पुतळ्यावर 'कोयता हल्ला', एकाला अटक!

•Pune Mahatma Gandhi Statue : भगव्या वस्त्रातील माथेफिरुची अघोरी कृती; राज्यासह शहरात तीव्र संताप, काँग्रेस आक्रमक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune News : गांधीजींचा अपमान! पुण्यात मध्यरात्री पुतळ्यावर 'कोयता हल्ला', एकाला अटक!

•Pune Mahatma Gandhi Statue : भगव्या वस्त्रातील माथेफिरुची अघोरी कृती; राज्यासह शहरात तीव्र संताप, काँग्रेस आक्रमक

पुणे | रविवारी मध्यरात्रीच्या अंधारात पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसर एका अघोरी कृत्याने हादरला! राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर एका माथेफिरूने भगवे वस्त्र परिधान करून थेट कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज शुक्ला नामक या व्यक्तीने केलेल्या या विकृत कृत्याने अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पुणे पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी सूरज शुक्लाला ताब्यात घेतले असून, या घटनेने शहरासह राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे.

या गंभीर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने तातडीने आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून त्यांच्या विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.

रोहित पवार म्हणाले की,"गोडसेचे वारसदार कितीही डोकं आपटू देत, गांधी विचार अमर!"

याच घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे फायरब्रँड आमदार रोहित पवार यांनीही आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. "नथुराम गोडसे गेले असले तरी, त्यांच्या विचारांचे वारसदार आजही समाजात आहेत. महात्मा गांधींच्या विचारांना संपवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत आणि होणारही नाहीत," असे ठामपणे सांगत रोहित पवार यांनी, "गोडसेच्या विचारांचे वारसदार कितीही डोके आपटले किंवा चुकीच्या गोष्टी केल्या तरी, या भूमीतून महात्मा गांधींचा विचार कधीही संपणार नाही, तो अमर राहील," असे परखड शब्दांत सुनावले.

हेही वाचा: Pune Crime News : पुण्यात पोलिसांचा ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’!शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल चोरणारे 4 अट्टल गुन्हेगार 12 तासांत गजाआड

शेअर करा