मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : माजी लोकसभा खासदाराच्या मुलाचा मृतदेह सापडला, आत्महत्या की हत्या?

Mp Kisanrao Bankheles Son Commits Suicide : पुण्याचे माजी खासदार किसनराव बाणखेले यांचा मुलगा विकास बाणखेले याचा मृतदेह राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune News : माजी लोकसभा खासदाराच्या मुलाचा मृतदेह सापडला, आत्महत्या की हत्या?

Mp Kisanrao Bankheles Son Commits Suicide : पुण्याचे माजी खासदार किसनराव बाणखेले यांचा मुलगा विकास बाणखेले याचा मृतदेह राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण मानत असून तपास सुरू आहे. विकासच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ आहे.

पुणे :- माजी लोकसभा खासदाराचा मुलगा मृतावस्थेत सापडला आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.Mp Kisanrao Bankheles Son Commits Suicide मृत विकास किसनराव बाणखेले (वय 52) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विकासचे घर आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे होते.विकास बाणखेले यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. दिवंगत खासदार किसनराव बाणखेले यांचे ते धाकटे चिरंजीव होते.

या घटनेमागील कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण आहे. सध्या याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे.

विकास बाणखेले यांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विकासचे वडील किसनराव बाणखेले हे ज्येष्ठ राजकारणी होते. 1988 मध्ये पुणे जिल्ह्यातील खेडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. ते जनता दलाचे नेते होते. 2014 मध्ये किसनराव यांचे निधन झाले.

शेअर करा