मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : फ्लॅटमध्ये आढळून आले 300 मांजरी, वास आणि आवाजाने लोक हैराण, तक्रार दाखल

• अधिकाऱ्याने सांगितले की, या तक्रारींच्या आधारे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पोलिसांसह सोसायटीला भेट दिली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune News : फ्लॅटमध्ये आढळून आले 300 मांजरी, वास आणि आवाजाने लोक हैराण, तक्रार दाखल

•अधिकाऱ्याने सांगितले की, या तक्रारींच्या आधारे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पोलिसांसह सोसायटीला भेट दिली. आम्हाला 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये 300 मांजरी सापडल्या. तिथे खूप वास येत होता.

पुणे :- पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी पुण्यातील एका निवासी सोसायटीच्या फ्लॅटला भेट दिली, जिथे सुमारे 300 मांजरी ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हडपसर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, फ्लॅट मालकाला मांजरांना योग्य ठिकाणी नेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

ते म्हणाले की हडपसरमधील मार्वल बाउंटी हाऊसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी तक्रार केली होती की फ्लॅट मालकाने त्यांच्या फ्लॅटमध्ये 300 हून अधिक मांजरी ठेवल्या आहेत, ज्यामुळे स्वच्छतेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

मांजरींमुळे दुर्गंधी आणि जास्त आवाजाच्या सतत तक्रारी येत होत्या. अधिकाऱ्याने सांगितले की, या तक्रारींच्या आधारे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पोलिसांसह सोसायटीला भेट दिली. आम्हाला 3.5 बीएचके फ्लॅटमध्ये 300 मांजरी सापडल्या. तिथे खूप वास येत होता.

यानंतर मांजरांना योग्य ठिकाणी नेण्यासाठी फ्लॅट मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत पशुसंवर्धन विभागाने फ्लॅट मालकाला लवकरात लवकर मांजरांना इतर ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तेथे राहणाऱ्या लोकांच्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठीही हे पाऊल आवश्यक असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Akola News : अकोल्यात दोन गटात हाणामारी, वाहन पेटवले, 6 जण जखमी

शेअर करा