मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : महापालिकेकडून 'मिशन खड्डेमुक्त शहर'; एका महिन्यात रस्ते चकाचक करण्याचे टार्गेट

महापालिकेकडून 'मिशन खड्डेमुक्त शहर'; एका महिन्यात रस्ते चकाचक करण्याचे टार्गेट

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

महापालिकेकडून 'मिशन खड्डेमुक्त शहर'; एका महिन्यात रस्ते चकाचक करण्याचे टार्गेट
महापालिकेकडून 'मिशन खड्डेमुक्त शहर'; एका महिन्यात रस्ते चकाचक करण्याचे टार्गेट

Pune News : पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांच्या टीकेला सातत्याने सामोरे जावे लागत असलेल्या महापालिका प्रशासनाने आता अखेर गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेने शहरात 'मिशन खड्डेमुक्त शहर' हाती घेतले असून, येत्या एका महिन्यात संपूर्ण शहरातील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याचे कडक निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या मोहिमेसाठी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एका स्वतंत्र कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवरून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थायी समितीच्या अध्यक्षांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की, "आठवडाभरात शहरातील सर्व खड्डे बुजवले नाहीत, तर तीव्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरु. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी तातडीने सर्व विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत शहरातील १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे पथ विभागामार्फत बुजवण्यासाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. https://maharashtramirror.com/ Pune News

या मोठ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी थेट पथ विभागामार्फत विशेष मोहीम राबवली जाईल. यासाठी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत प्रत्येकी एका कार्यकारी अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. हे नियुक्त केलेले कार्यकारी अभियंता पथ विभाग आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पथकासह प्रत्यक्ष फिल्डवर उतरून खड्डे बुजण्याचे काम पूर्ण करतील. लहान आकाराच्या रस्त्यांची आणि गल्ल्यांमधील खड्डे बुजवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उपायुक्त आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. https://maharashtramirror.com/wp-admin Pune News

रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरण्याच्या कामात निधीची अडचण येऊ नये म्हणून महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकात खड्डे दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्यात आलेला निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून या विशेष मोहिमेच्या प्रत्यक्ष कामांना जोरदार सुरुवात होणार असून, पुढील एका महिन्याच्या आत संपूर्ण पुणे शहर खड्डेमुक्त करण्याचे काटेकोर टार्गेट प्रशासनाने निश्चित केले आहे. या मोहिमेमुळे आगामी काळात पुणेकरांचा प्रवास सुखकर होईल आणि टीकेचा धनी बनलेल्या प्रशासनाला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

शेअर करा