Pune Crime : मार्केटयार्ड परिसरात छापा टाकत २५ लाखांचे एमडी जप्त
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शहरात राबविण्यात येत असलेल्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २५ लाख रुपये किमतीचा मेफेड्रॉन तथा एम.डी.
1 मिनिट वाचन

Pune Crime : मुख्य आरोपी अटकेत; एकावर गुन्हा दाखल
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शहरात राबविण्यात येत असलेल्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २५ लाख रुपये किमतीचा मेफेड्रॉन तथा एम.डी. हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून,त्याच्या भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओम कुंडलिक गायकवाड (वय २५, रा. आनंदनगर वसाहत, मार्केटयार्ड, पुणे) असे अटक करण्यात करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हा दाखल झालेल्याचे नाव समजू शकले नाही.https://maharashtramirror.com/ Pune crime
मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महिबूब नदाफ अंमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती काढत असताना, त्यांना आनंदनगर वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाजवळील गल्लीत ओम गायकवाड आणि त्याचा भाऊ त्यांच्या राहत्या घरातून अवैध दारू आणि अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे समजले. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकत २५ लाख रुपये किमतीचा १२५ ग्रॅम वजनाचे एम.डी., दहा हजार ४०० रूपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम यासह एक तलवार, एक कुऱ्हाड, एक लोखंडी पाईप
आणि अंमली पदार्थाच्या वजनासाठी वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण २५ लाख १८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, पोलीस निरीक्षक सुनिता नवले, पोलीस उप-निरीक्षक अक्षयकुमार गडगडे, पोलीस अंमलदार दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, महिबूब नदाफ यांच्यासह पथकाने केली.




