मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : केडगावात बंद घर फोडून पावणेदोन लाखांची चोरी

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

केडगावात बंद घर फोडून पावणेदोन लाखांची चोरी यवत पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
केडगावात बंद घर फोडून पावणेदोन लाखांची चोरी यवत पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

Pune Crime : यवत पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. केडगाव येथील देशमुखमळा, शेलार मोरेवस्ती येथे राहणाऱ्या एका मजुराचे बंद घर चोरट्यांनी लक्ष्य करत कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे.या प्रकरणी प्रफुल्ल बाळासाहेब कदम (वय २९, रा. शेलार मोरेवस्ती, केडगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ व ३३१(३) अन्वये घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी (२९ ऑगस्ट) सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० या वेळेत कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. या अल्प कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात व बरणीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये ७५ हजार रुपये किमतीचे १ सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे मणी गंठण, ५४ हजार रुपये किमतीचे ९ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुबे व वेल, ६० हजार रुपये किमतीच्या १ तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १,९४,००० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. फिर्यादी हे दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तातडीने यवत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जगताप करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime

ऐन दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे केडगाव आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीच्या व दिवसाच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

शेअर करा