मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : गरवारेच्या आवारात पूर्व परवानगीशिवाय लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या परिसरात मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केल्याप्रकरणी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला (एमईएस) पुणे विद्यापीठ आणि एआयसीटीईने नोटीस बजावली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

गरवारे’ च्या आवारात पूर्वपरवानगीशिवाय लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय
गरवारे’ च्या आवारात पूर्वपरवानगीशिवाय लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय

Pune News : एमईएसला पुणे विद्यापीठासह एआयसीटीईने बजावली नोटीस

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या परिसरात मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केल्याप्रकरणी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला (एमईएस) पुणे विद्यापीठ आणि एआयसीटीईने नोटीस बजावली आहे. दरम्यान, युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणी संस्थेच्या कारभारावर आक्षेप घेतले आहेत.यावेळी कल्पेश यादव यांनी पुराव्यांसह भूमिका मांडताना सांगितले की, संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालय सुरुवातीला मयूर कॉलनीतील संस्थेच्या शैक्षणिक संकुलात सुरू केले होते. प्रत्यक्षात या महाविद्यालयासाठी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची जागा प्रस्तावित असून, तेथील नव्याने बांधलेल्या इमारतीत ते सुरू होणे अपेक्षित होते. https://maharashtramirror.com/ Pune news

याबाबत पाठपुरावा केल्यानंतर संस्थेच्या नियामक मंडळाला चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी रातोरात हे महाविद्यालय संस्थेच्या कर्वे रस्त्यावरील शैक्षणिक संकुलात हलवण्याचे ठरवले. मात्र, दोन वर्षांनंतरही अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत पूर्ण झाली नसल्याने त्यांनी ते आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या इमारतींमध्ये स्थलांतरित केले. मात्र, ही प्रक्रिया करताना त्यांनी एआयसीटीई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डीबाटूची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही. या गैरप्रकाराचा आम्ही विरोध केल्यानंतर आणि संबंधित संस्थांकडे तक्रार केल्यानंतर संस्थेच्या नियामक मंडळाने उशिराने परवानगीसाठी अर्ज दाखल केले. मात्र, या अर्जांमधील माहितीतही फेरफार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही पुणे विद्यापीठ आणि एआयसीटीईकडे याबाबत अधिक माहिती मागितली.त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या महाविद्यालयाची परवानगी कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकते, याची विद्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी, असे यादव यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Pune News

महापालिकेने हस्तक्षेप करावा

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या इमारतींसह आजूबाजूला नव्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्याचप्रमाणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या इमारतींवरही मजले चढवण्यात येत आहेत. या बांधकामांसाठी पर्यावरण विभागाची, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पुणे महापालिकेची परवानगी घेण्यात आली नसल्याचे कागदोपत्री उघड झाले आहे. या अवैध बांधकामप्रकरणी एमपीसीबीच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेने चालू केलेले बेकायदा वर्ग बंद करुन विद्यार्थी आणि पालकांचे नुकसान टाळावे, असे आवाहन कल्पेश यादव यांनी केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

गरवारे महाविद्यालयात शिकणाऱ्या चार हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी कुठे जायचे?

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची दैदिप्यमान शैक्षणिक परंपरा लाभली आहे. या संस्थेतून आणि महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी शिकून मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. तरीही या महाविद्यालयाच्या इमारतींमध्ये मुकुंददास लोहिया अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्थलांतर करणे कितपत योग्य आहे? गरवारे महाविद्यालयात शिकणाऱ्या चार हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी कुठे जायचे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, त्याची उत्तरे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ देणार का? याकडे लक्ष लागल्याचे कल्पेश यादव यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Pune News

“एकाच शैक्षणिक संकुलात दोन भिन्न विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालये सुरू असल्यास संबंधित विद्यापीठाने तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २००९च्या तरतुदीनुसार विद्यापीठाने अचानक भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने शैक्षणिक संस्थेच्या दबावाखाली येऊन कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाने केलेल्या गैरप्रकारांना अभय मिळत असल्याने, शैक्षणिक संस्था, डीबाटू समिती आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या दोषी अधिकाऱ्यांविरोधात कलम १७३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.”https://maharashtramirror.com/ Pune News

— कल्पेश यादव, राज्य सहसचिव, युवासेना

शेअर करा