मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime: डिजिटल अरेस्टच्या भितीने ज्येष्ठाला साडेसहा लाखांचा गंडा

Pune Crime: पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ६ लाख ५१ हजार २०० रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

डिजिटल अरेस्टच्या भितीने ज्येष्ठाला साडेसहा लाखांचा गंडा
डिजिटल अरेस्टच्या भितीने ज्येष्ठाला साडेसहा लाखांचा गंडा

Pune Crime: पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime: पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ६ लाख ५१ हजार २०० रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात मोबाईलधारकासह बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील राहणाऱ्या ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला २० ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान काही अज्ञातांनी मोबाईलवर संपर्क साधला. संशयित आरोपींनी फिर्यादींना त्यांच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलीस कारवाई आणि अटकेची भीती दाखवून त्यांना जाळ्यात ओढले. घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन करून, आरोपींनी त्यांना तातडीने बँकेत जाऊन आरटीजीएस फॉर्म भरून पैसे विशिष्ट बँक खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर पुढील तपास करत आहेत.

शेअर करा