मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी २६५ कंत्राटी कर्मचारी तातडीने नियुक्त करा

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शहरामध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून डास नियंत्रणासाठी प्रस्तावित अतिरिक्त २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने तातडीने पूर्ण करावी, असे कडक निर्देश महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीना

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी २६५ कंत्राटी कर्मचारी तातडीने नियुक्त करा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश
डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी २६५ कंत्राटी कर्मचारी तातडीने नियुक्त करा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

Pune News : स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शहरामध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून डास नियंत्रणासाठी प्रस्तावित अतिरिक्त २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने तातडीने पूर्ण करावी, असे कडक निर्देश महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले आहेत. ज्या भागांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे, तिथे या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने तैनात करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहर आणि परिसरात यंदाच्या हंगामात आतापर्यंत डेंग्यूचे १८२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, चिकुनगुनियाचे १४ संशयित रुग्ण आढळले असून हे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेषतः ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याचे समोर आल्यानंतर भिमाले यांनी महापालिकेच्या आरोग्य व डास नियंत्रण विभागाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.https://maharashtramirror.com/ Pune News

डास नियंत्रणासाठी महापालिकेने यापूर्वी १५० कायमस्वरूपी पदे भरली आहेत. मात्र, वाढता प्रादुर्भाव पाहता हे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने आणखी २६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यावरून प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढत भिमाले म्हणाले, “पावसाळा संपत आला तरी हे प्रस्तावित कर्मचारी अद्याप प्रत्यक्ष कामावर उपलब्ध का झाले नाहीत? पावसाळ्यापूर्वीच हे आवश्यक मनुष्यबळ सज्ज ठेवणे अपेक्षित होते. मग नियुक्तीच्या या प्रक्रियेला इतका विलंब का झाला आणि या विलंबाला जबाबदार कोण?” असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला.https://maharashtramirror.com/ Pune News

डासांची उत्पत्तीस्थळे आढळली अशा मिळकतदारांवर दंडात्मक कारवाई करूनही डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांचा आलेख वाढताच असेल, तर पालिकेची डास नियंत्रण मोहीम प्रत्यक्षात किती परिणामकारक ठरत आहे, याचा सखोल आढावा घेण्याची गरज असल्याचे भिमाले यांनी नमूद केले. शहरातील ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत, ते भाग ‘हॉटस्पॉट’ म्हणून घोषित करावे. हॉटस्पॉट परिसरामध्ये सर्वेक्षण करून डासांची उत्पत्तीस्थळे तात्काळ नष्ट करावीत. डासनाशक औषध फवारणी आणि धूर फवारणीची विशेष मोहीम युद्धापातळीवर राबवावी. संपूर्ण मोहिमेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोजच्या रोज आढावा घ्यावा. असे आदेश यावेळी देण्यात आले. https://maharashtramirror.com/ Pune News

अडीच लाखांचा दंड वसूल

महापालिकेच्या अहवालानुसार, वर्षभरात ज्या ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थळे आढळली अशा तब्बल १,७०८ मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ६५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शेअर करा