मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PUNE CRIME : पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीचे कनेक्शन पुण्यात

पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीचे कनेक्शन पुण्यात

PK
Pratiksha Kate

2 मिनिट वाचन

PUNE CRIME

PUNE CRIME : शहजाद भट्टी ऑनलाइन नेटवर्क प्रकरणी एटीएसची मोठी कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात ८८ जणांची चौकशी

PUNE CRIME : पाकिस्तानस्थित शहजाद भट्टीशी संबंधित कथित ऑनलाइन नेटवर्क प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाईचा वेग वाढवला आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील तब्बल ८८ जणांची चौकशी एटीएसकडून सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडिया माध्यमातून देशविरोधी विचारांचा प्रसार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण आणि तरुणांना कथितपणे या नेटवर्कच्या संपर्कात आणण्याच्या प्रयत्नांचा तपास करण्यात येत आहे.

एटीएसने पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स, ऑनलाइन संपर्क आणि डिजिटल व्यवहारांची तपासणी केली जात आहे.( PUNE CRIME)

Maharera : बिल्डर नागपाल यांना दणका: १ कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. विविध व्हिडिओ, रील्स, संदेश आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन तसेच देशविरोधी विचारांचा प्रचार केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

ही कारवाई १० जुलै रोजी महाराष्ट्रभर राबविण्यात आलेल्या मोठ्या छापेमारी मोहिमेचा पुढील टप्पा असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे. त्या वेळी पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यातील विविध भागांमध्ये २०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते. या कारवाईत डिजिटल उपकरणे, कागदपत्रे आणि इतर महत्त्वाचे पुरावे तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. (PUNE CRIME)

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी निलंबित

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच जणांची चौकशी

पिंपरी-चिंचवड शहरात एटीएसने पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये चाकण परिसरातील दोन जणांचा समावेश आहे. तसेच रावेत, वाकड आणि भोसरी येथून प्रत्येकी एका तरुणाची चौकशी करण्यात आली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या पाच जणांनी शहजाद भट्टीशी संबंधित काही व्हिडिओ आणि सोशल मीडिया रील्स लाईक किंवा शेअर केल्याचे आढळून आले आहे. मात्र, या व्यक्तींचा शहजाद भट्टी किंवा त्याच्या साथीदारांशी थेट संपर्क असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही.(PUNE CRIME)

ताब्यात घेतलेल्या पाच जणांपैकी तीन जण उत्तराखंड येथील रहिवासी आहेत. तर एक जण उत्तर प्रदेश आणि एक जण कर्नाटक येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सोशल मीडिया वापराचा तपशील, कोणत्या व्यक्तींशी संपर्क होता, कोणत्या प्रकारची माहिती शेअर केली जात होती, याचा तपास सुरू आहे.

Moshi Garbage Depot : एएलआर कंपनीच्या प्रोजेक्ट हेड आणि सेफ्टी ऑफिसरला अटक

डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू

एटीएसकडून या प्रकरणात डिजिटल पुराव्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. संशयितांच्या मोबाईलमधील माहिती, सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी, संदेश व्यवहार आणि ऑनलाइन संपर्कांची तपासणी केली जात आहे. या माध्यमातून संबंधित नेटवर्कचा विस्तार आणि त्यातील सहभागी व्यक्तींची भूमिका निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.(PUNE CRIME)

तपास अधिकाऱ्यांच्या मते, केवळ सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ किंवा रील्स शेअर केल्याच्या आधारे कोणावरही अंतिम कारवाई केली जाणार नाही. संबंधित व्यक्तींची भूमिका, हेतू आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

सुरक्षा यंत्रणांनी डिजिटल माध्यमातून होणाऱ्या कट्टरतावादी प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांना प्रभावित करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.(PUNE CRIME)

दरम्यान, एटीएसचा तपास अद्याप सुरू असून, चौकशीतून आणखी काही संशयित किंवा संपर्क समोर येण्याची शक्यता आहे. डिजिटल नेटवर्कचा पूर्ण उलगडा करण्यासाठी तपास यंत्रणांकडून विविध स्तरांवर माहिती गोळा केली जात आहे.(PUNE CRIME)

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा