मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News : बँकॉकहून 10.3 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक वीड तस्करी केल्याप्रकरणी मुंबई विमानतळ कस्टम्सने 2 जणांना अटक केली आहे

•बँकॉकहून 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हायड्रोपोनिक वीडची तस्करी केल्याच्या आरोपाखाली मुंबई विमानतळ कस्टम अधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Crime News : बँकॉकहून 10.3 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक वीड तस्करी केल्याप्रकरणी मुंबई विमानतळ कस्टम्सने 2 जणांना अटक केली आहे

•बँकॉकहून 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हायड्रोपोनिक वीडची तस्करी केल्याच्या आरोपाखाली मुंबई विमानतळ कस्टम अधिकाऱ्यांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे :- बँकॉकहून 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हायड्रोपोनिक वीड तस्करी केल्याच्या आरोपाखाली मुंबई विमानतळ कस्टम अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांना अटक केली आहे.

बँकॉकहून पुण्याला येणाऱ्या दोन प्रवाशांना विमानतळाव कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्या चेकिंग केलेल्या सामानाची तपासणी केली असता अधिकाऱ्यांना 11 हवाबंद पाउच जप्त केले आहे यामध्ये 9864 ग्रॅम हिरव्या रंगाचा हायड्रोपोनिक वीड हा अंमली पदार्थ आढळून आला आहे. तसेच मुंबईत एकाच वेळी केलेल्या पाठपुराव्यात तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 478 ग्रॅम चरस आणि हायड्रोपोनिक वीड हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बेकायदेशीर अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात साधारणपणे दहा कोटी तीन लाख रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांच्या विरोधात एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदीनुसार तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट

शेअर करा