मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News | हनी ट्रॅप, खंडणी प्रकरणात पोलीस उपनि काशिनाथ उभे यांचा सहभाग : पुणे पोलीस दलात चाललंय काय?

विश्रामबाग पोलिसांकडून सखोल चौकशी

M
mubarak

1 मिनिट वाचन

PSI Kashinath Ubhe

  • विश्रामबाग पोलिसांकडून सखोल चौकशी
  • पुणे, दि. ३ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News

    प्रेम प्रकरणातून हनी ट्रॅप Honey trap करत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करणाऱ्या तीन महिलांसोबत त्यांचा साथीदार म्हणून पोलीस उपनि काशिनाथ उभे (PSI Kashinath Ubhe) यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलीस उपनि काशिनाथ उभे यांचे नाव आरोपी म्हणून समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

    काल दि. २ रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादी यांच्या तक्रारीवरून १. अवंतिका सोनवणे २. आरती गायकवाड ३. पूनम पाटील व इतर यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात अधिक तपास करताना पोलीस अधिकारी उपनि काशिनाथ उभे यांचा सहभाग निश्चित करण्यात आला.

    पोलीस उपनि काशिनाथ उभे सध्या पोलीस मुख्यालय येथे नियुक्तीस आहेत. त्यांना पुण्यातील 'चर्चित' पोलीस म्हणून ओळखले जाते. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते पसार झाले असल्याची माहिती येत आहे.

    PSI Kashinath Ubhe (Police HQ)

    सदर गुन्ह्याचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनि मनोज बरुरे (PSI Manoj Barure) करत आहेत.

    पुणे पोलीस दलात चाललंय काय?

    Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याची सूत्रे स्वीकारल्यापासून पुण्यातील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. अमितेश कुमार यांनी 'मिशन ६५' राबवत वसुली बहाद्दर यांना सक्त ताकीद देत हक्काच्या ठिकाण्यावरून इतरत्र हलविले. त्यामुळे अवैध धंद्याबाबत पुणे पोलिसांची भूमिका नेमकी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    हेही वाचा: Kalamandi Exhibition | महिला सशक्तीकरणाचे प्रतीक ठरतंय 'कलामंडी'

    शेअर करा