मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News : पोलीसांना गुंगारा देणारा 'धनराज' गजाआड

पुणे, दि.

M
mubarak

1 मिनिट वाचन

Pune Crime News : पोलीसांना गुंगारा देणारा 'धनराज' गजाआड

पुणे, दि. 29 ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर Pune crime news

शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या खुनाच्या गुन्हयामध्ये २ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणाऱ्या धनराज ऊर्फ धन्या यास पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 5 कडून जेरबंद करण्यात आले आहे. Pune crime news

पुणे ग्रामीण पोलीस कडील शिक्रापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १०७८/२०२२ भादवि कलम. ३०२,१४१,१४३,१४७,१४८,१४९,३४१, ३२४ या गुन्हयात आरोपी नामे. धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत हा गुन्हा केल्यानंतर सुमारे ०२ वर्षापासुन स्थानिक पोलीसांना गुंगारा देवुन लपुन बसत होता.

दि.२८/०८/२०२४ रोजी पाहिजे आरोपी धनराज शांतीलाल शेरावत, वय. २३ वर्षे, रा. म्हसोबा नगर म्हशीच्या गोटया जवळ, वेस्टन फोरजी कंपनी, सणसवाडी तळेगाव रोड, ता. शिरुर जि.पुणे हा अमरधाम स्मशानभुमीजवळ माळवाडी हडपसर पुणे या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाल्याने युनिट ०५ कडील पोलीस पथकाने त्यास सापळा रचुन जेरबंद केले.

आरोपी धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत यास ताब्यात घेवुन त्याची ओळख पटवुन त्याने व त्याचे साथिदारांनी मिळुन सणसवाडी परिसरामध्ये खुन केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाही करीता शिक्रापुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामिण यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सपोनि. कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले, पृथ्वीराज पांडुळे, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, शहाजी काळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शशिकांत नाळे, अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, उमाकांत स्वामी व शुभांगी म्हाळशेकर यांचे पथकाने केली आहे.

शेअर करा