Pune Crime : सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; तीन गावठी कट्टे, चार काडतुसे जप्त
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
1 मिनिट वाचन

Pune Crime : दोन दिवसांत दोन स्वतंत्र कारवाया; दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील दोन दिवसांत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ ऑगस्ट रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव आणि पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी गस्त घालत होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास साई सिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठदरम्यान श्री कोचिंग क्लासेससमोरील गल्लीत एका तरुणाची तपासणी करण्यात आली. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४१/२०२६ नुसार भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune Crime
दुसरी कारवाई २७ ऑगस्ट रोजी करण्यात आली. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाला कात्रज डेअरी चौक ते सरहद चौकदरम्यान एक व्यक्ती अग्निशस्त्रासह थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोध घेत शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. आंबेगाव पठार, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४४४/२०२६ नुसार भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पहिल्या कारवाईतील आरोपीचे वय १८ वर्षे असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या दोन्ही कारवायांत एकूण तीन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली.




