मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Beam Light Cases | पुण्यात बीम लाईट लावणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल

आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या बीम लाईटचा वापर टाळा : पुणे पोलिसांचे आवाहन

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune beam light cases

  • आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या बीम लाईटचा वापर टाळा : पुणे पोलिसांचे आवाहन
  • पुणे, दि. ११ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Beam Light Cases

    उत्सव साजरा करताना डीजे सोबत थिरकण्यासाठी बीम लाईटचा वापर करणाऱ्या मंडळावर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वाघोली परिसरात दहीहंडी साजरा करताना शार्पी लाईट, बिम लाईट लावणाऱ्या चार मंडळांवर केले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोणीकंद पोलिसांकडून मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या मंडळांच्या अध्यक्षांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. Pune Beam Light Cases

    लोणीकंद पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दहीहंडी सणामध्ये काही मंडळांनी लेझर लाईट लावण्या मनाई आदेश असतानाही शार्पी लाईट, बिम लाईट लावून आदेशाचा भंग केलेल्या मंडळांच्या अध्यक्षांवर दि.10/09/24 रोजी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे 04 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील मुद्देमाल कायदेशीर पद्धतीने जप्त करून नमूद गुन्ह्यातील आरोपींना BNSS 135 (1) (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली.

    दाखल केलेले गुन्हे खालील प्रमाणे

    1) गु. रजि. नं - 839/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे

    अध्यक्ष, शुभम सुभाष पवार, अमरदीप प्रतिष्ठान बायफ रोड वाघोली पुणे

    2) गु. रजि. नं - 840/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे

    अध्यक्ष, अविनाश काळुराम कुटे, गणेश बापू कुटे युवा मंच आवळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे

    3) गु. रजि. नं. 841/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे

    इसम नामे प्रितेश सतिष हरगुडे रा. केसनंद ता हवेली जि पुणे

    4) गु. रजि. नं. 842/2024 भा. न्या. सं. 223 प्रमाणे

    अध्यक्ष महेंद्र परशुराम भाडळे वाघेश्वर तरुण मंडळ राहणार वाघोली पुणे

    तसेच ध्वनी प्रदूषण चे स्वारगेट पोलीस स्टेशन येथे 08 गुन्हे, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे 12 गुन्हे व सहकार नगर पोलीस स्टेशन येथे 'लेझर लाईटचा एक गुन्हअसे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    हेही वाचा: Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची दानपेटी उघडली, तिसऱ्या दिवशीही आले लाखो रुपयांचे सोने-चांदीचा मोठ्या प्रमाणात दान

    शेअर करा