मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Political News : विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रशांत जगताप यांचा आरोप

सीओइपी प्रकाराकडे केवळ दोन विद्यार्थी संघटनांमधील वाद म्हणून पाहता येणार नाही

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रशांत जगताप यांचा आरोप
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रशांत जगताप यांचा आरोप

Pune Political News: सीओइपी प्रकाराकडे केवळ दोन विद्यार्थी संघटनांमधील वाद म्हणून पाहता येणार नाही

Pune Political News : महाराष्ट्र मिरर पुणे, २२ ऑगस्ट : काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेसची भूमिका मांडताना सीओइपी प्रकाराकडे केवळ दोन विद्यार्थी संघटनांमधील वाद म्हणून पाहता येणार नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना जगताप म्हणाले, राहुल गांधी विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी पुण्यात येत असताना कार्यक्रमाच्या आधीच अशा स्वरूपाचा प्रकार घडणे गंभीर आहे. या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या सदस्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५० ते ६० युवक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विद्यार्थिनींना कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आणि त्यानंतर परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळत उलट विद्यार्थिनींनाच धमकावण्यात आल्याचा आरोप केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Political News
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सीओइपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात परिषदेच्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
भाजपच्या बाजूने शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केल्यानंतर आता काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसची बाजू मांडली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Political News
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण वादाची सुरुवात राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींवर दबाव टाकण्यावरून झालेली नसून, शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत भूमिका मांडणाऱ्या दोन विद्यार्थिनींना परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनी राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाच्या समर्थनार्थ बोलल्या होत्या, असा काँग्रेस आणि युवक काँग्रेसचा दावा आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सीओइपी वसतिगृह परिसरात पोहोचले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थिनींना धमकावण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ झाला आणि परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

शेअर करा