मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pranit More : 'बिग बॉस-19'मधून बाहेर गेलेला कॉमेडियन प्रणीत मोरे लवकरच परतणार?

Big Boss Pranit More Latest Update : डेंग्यूमुळे वैद्यकीय उपचारांसाठी घराबाहेर; टीमकडून 'हेल्थ अपडेट' जारी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pranit More : 'बिग बॉस-19'मधून बाहेर गेलेला कॉमेडियन प्रणीत मोरे लवकरच परतणार?

Big Boss Pranit More Latest Update : डेंग्यूमुळे वैद्यकीय उपचारांसाठी घराबाहेर; टीमकडून 'हेल्थ अपडेट' जारी

मुंबई :- 'बिग बॉस-19' Big Boss 19 मधून महाराष्ट्राचा लाडका कॉमेडियन प्रणीत मोरे Pranit More याचं बाहेर जाणं चाहत्यांसाठी सर्वात मोठा धक्का होता. गेल्या आठवड्यात, बसीर आणि नेहल घराबाहेर गेल्यानंतर, या आठवड्यात प्रणीत मोरेला वैद्यकीय कारणांमुळे शो सोडावा लागला. प्रणीत मोरेला डेंग्यू झाल्यामुळे त्याला खेळ पुढे नेता आला नाही. सलमान खानने 'वीकेंड का वार'मध्ये ही घोषणा केली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण होतं. मात्र, आता प्रणीत मोरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

खरं कारण 'एलिमिनेशन' नाही

प्रणीत मोरेला 'बिग बॉस सीजन 19 'मधून बाहेर काढण्यात आलेलं नाही, तर डेंग्यूमुळे त्याला केवळ वैद्यकीय मदतीसाठी बाहेर पाठवण्यात आलं आहे.

सलमान खानने 'वीकेंड का वार' भागात स्पष्ट केलं होतं की, डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार प्रणीतला उपचारांसाठी घर सोडावे लागेल आणि तो जात असल्यामुळे इतर सर्व सदस्य सुरक्षित आहेत.

प्रणीत मोरे लवकरच परतणार?

प्रणीत मोरे घराबाहेर पडताच, त्याच्या टीमने चाहत्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने एक हेल्थ अपडेट जारी केलं. त्यांनी प्रणीत मोरेच्या ऑफिशियल इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं.

"मित्रांनो, तुम्हाला सर्वांसोबत एक अपडेट शेअर करायची होती. आता प्रणितची प्रकृती ठीक आहे. आम्ही 'बिग बॉस टीम'शी सतत संपर्कात आहोत आणि ते आम्हाला त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि प्रार्थनांसाठी खूप खूप धन्यवाद… कृपया त्याला लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत राहा… जय हिंद, जय महाराष्ट्र!"

प्रणीतची प्रकृती सुधारत असल्याने आणि टीम सतत बिग बॉसच्या टीमशी संपर्कात असल्याने, प्रणीत मोरे लवकरच बरा होऊन शोमध्ये पुन:प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरातले त्याचे मित्रही त्याला लवकर परत येण्याची विनंती कॅमेऱ्यासमोर करत आहेत.

दरम्यान, प्रणीत मोरे सध्या एका सीक्रेट रूममध्ये वैद्यकीय उपचारांसाठी ठेवण्यात आला आहे. त्याच्या जाण्यानंतर, आणखी एका नॉमिनेशन कार्यात फरहाना भट्ट, गौरव खन्ना, नीलम गिरी, अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

शेअर करा