मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Prakash Mahajan : भाजपप्रवेशाबाबत प्रकाश महाजनांचे नागपुरात सूचक विधान! - माजी मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांच्या 'रामगिरी' बंगल्यावर हजेरी, राजकीय चर्चांना उधाण

Prakash Mahajan On MNS : "मनसे हिंदुत्वापासून दूर गेली" म्हणत राज ठाकरेंवर टीका; 'कमळा'कडे गेलेल्या वैभव खेडेकरांवर कौतुक; "आता भाजपानं ठरवावं," महाजनांचा सूचक इशारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Prakash Mahajan : भाजपप्रवेशाबाबत प्रकाश महाजनांचे नागपुरात सूचक विधान! - माजी मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांच्या 'रामगिरी' बंगल्यावर हजेरी, राजकीय चर्चांना उधाण

Prakash Mahajan On MNS : "मनसे हिंदुत्वापासून दूर गेली" म्हणत राज ठाकरेंवर टीका; 'कमळा'कडे गेलेल्या वैभव खेडेकरांवर कौतुक; "आता भाजपानं ठरवावं," महाजनांचा सूचक इशारा

नागपूर :- राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Session Nagpur 2025) चौथ्या दिवशी नागपुरात मोठी राजकीय चर्चा रंगली. मनसेचे माजी ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मनसेतून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'रामगिरी' निवासस्थानी भेट घेतली. यावेळी प्रकाश महाजन यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या संभाव्य निर्णयावर सूचक विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, हे वैयक्तिक काम असून मुख्यमंत्र्यांसोबत आमचे पारिवारिक संबंध आहेत. त्यांनी यावेळी वैभव खेडेकर यांचे तोंडभरून कौतुक केले. "भाजपामध्ये वैभव खेडेकर खूप आनंदी आहे. माझ्या पाल्याचा आनंद पाहायला आलो आहे. वैभव खेडेकर कमळाकडे गेला, त्यामुळे मी खूश आहे," असे ते म्हणाले.

याचवेळी त्यांनी भाजपप्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केले. "भाजपाचा पराभव झाल्यावर आम्हाला वाईट वाटतं, नातं जुनं आहे. मी कधीच भाजपाविरोधात काम केलेलं नाही. आता भाजपानं ठरवायचं आहे," असे विधान करून त्यांनी आपल्या राजकीय भविष्याबाबत उत्सुकता निर्माण केली.

राज ठाकरेंवर टीका

मनसे सोडण्यामागचे कारण स्पष्ट करताना प्रकाश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. "मनसे हिंदुत्वापासून दूर जाते आहे. त्यांनी हिंदुत्वाच्या प्रश्नावर माघार घेतली. मनसेतून बाहेर पडण्यामागे हेच कारण आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच, "मी राज ठाकरेंना घाबरत नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे, शाखेत देखील जातो," असे स्पष्ट करत त्यांनी, संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट केल्यावरून अभिनेता रमेश परदेशी (पिट्या भाई) यांचा राज ठाकरेंनी केलेल्या पाणउताऱ्याबद्दलही टीका केली.

शेअर करा