मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी भीम जयंतीच्या दिल्या शुभेच्छा, स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय…..

Prakash Ambedkar On Ambedkar Jayanti : बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भीम जयंतीच्या दिनाच्या शुभेच्छा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी भीम जयंतीच्या दिल्या शुभेच्छा, स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय…..

Prakash Ambedkar On Ambedkar Jayanti : बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भीम जयंतीच्या दिनाच्या शुभेच्छा

मुंबई :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जयंतीच्या शुभेच्छा एक संदेश दिला आहे. Prakash Ambedkar शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा यात्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव करणारे आहे. Ambedkar Jayanti 2024

प्रकाश आंबेडकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर हजारो वर्षांचा अन्याय, अज्ञान आणि अस्पृश्यतेच्या अनेक पिढ्यांना आपल्या ज्ञानप्रकाशाने अंधारातून बाहेर काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक, तत्वज्ञ आणि दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांचा बुलंद आवाज असलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहेत.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणतात की,आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण ठेवून ते विचार कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब हे केवळ एका वर्गाचे नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव समाजासाठी, सर्व भारतीयांसाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण काम केलेले आहे. बाबासाहेबांची 134 वी जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण एकजूट होऊन समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या दिशेने बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करूया.

सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्वासाठी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊया…जिथे समता आहे, तिथेच खरे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार जपूया, जागरूकपणे आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवूया…! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! जय भीम!

शेअर करा