मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pooja - Soham Bandekar Reception : पूजा बिरारी-सोहम बांदेकर यांच्या शाही रिसेप्शनला राजकीय-मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी!

•आदित्य ठाकरेंकडून नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा; आदेश बांदेकरांची कडकडून भेट, "मी आहे, मी आहे…" म्हणत आदित्य ठाकरेंची फोटोग्राफर्ससोबत मजेशीर गप्पा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pooja - Soham Bandekar Reception : पूजा बिरारी-सोहम बांदेकर यांच्या शाही रिसेप्शनला राजकीय-मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी!

•आदित्य ठाकरेंकडून नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा; आदेश बांदेकरांची कडकडून भेट, "मी आहे, मी आहे…" म्हणत आदित्य ठाकरेंची फोटोग्राफर्ससोबत मजेशीर गप्पा

मुंबई :- मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर यांचा शाही रिसेप्शन सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंची खास उपस्थिती

या शाही सोहळ्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही उपस्थिती लावून सोहम आणि पूजाला शुभेच्छा दिल्या.

आदेश बांदेकरांची मिठी

आदित्य ठाकरे स्टेजवर नवविवाहित जोडप्याला भेटायला जात असताना त्यांची भेट सोहमचे वडील आदेश बांदेकर यांच्याशी झाली. आदित्य ठाकरेंना पाहताच आदेश बांदेकर खूपच खूश झाले आणि त्यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. आदित्य ठाकरेंनीही तितक्याच आपुलकीने ही मिठी स्वीकारली.यानंतर आदित्य ठाकरेंनी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचं अभिनंदन केलं.त्यानंतर त्यांनी सोहमला भेटून मिठी मारली आणि पूजासह दोघांनाही शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत फोटो काढले.

फोटोग्राफर्ससोबत मजेदार क्षण

आदित्य ठाकरे स्टेजवर पोहोचताच खाली उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सचे कॅमेरे त्यांच्यावर खिळले. काही वेळाने फोटोग्राफर्सनी 'आदित्य वेट वेट वेट…' अशी हाक मारायला सुरुवात केली. यावर आदित्य ठाकरे खळखळून हसले आणि म्हणाले, "मी आहे, मी आहे… बाकीच्यांनाही फोटो काढायचेत…" त्यानंतर त्यांनी पोज दिली आणि आनंदात तिथून निघाले.

हेही वाचा: भाईंदरच्या 'कस्तुरी हाइट्स' इमारतीला भीषण आग! - धुरामुळे सहा रहिवाशांची प्रकृती अस्थिर, दीड वर्षांच्या बाळासह पीडितांवर उपचार सुरू

शेअर करा