मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंबईत राजकीय वातावरण तापले ; बाळासाहेब ठाकरे यांचा बॅनर फाटल्याने ठाकरे गट आक्रमक

•बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे बॅनर काढताना बॅनर फाडले, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

मुंबईत राजकीय वातावरण तापले ; बाळासाहेब ठाकरे यांचा बॅनर फाटल्याने ठाकरे गट आक्रमक

•बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे बॅनर काढताना बॅनर फाडले, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुंबई :- मुंबईत काल रात्री सायन प्रतीक्षा नगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी ते रस्त्यावर बसले. बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर फाडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.बेकायदा बॅनर हटवताना बाळासाहेब ठाकरे यांचा बॅनर बीएमसी कर्मचाऱ्यांनी फाडला असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

बीएमसी अधिकाऱ्यांनी बॅनर हटवताना 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे यांच्या शिवसेनेने लावलेले बॅनर फाडले. त्यामुळे सायनमध्ये संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले.दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनरही काढण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे बॅनर काढताना बॅनर फाडले, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये रस्त्यावर बसून शिवसैनिकांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला.मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या जयंतीचे बॅनर काढून त्यातील एक बॅनर फाडून त्यांचा अवमान केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Panvel News : तीन वर्षाच्या मुलासह आई बेपत्ता

शेअर करा