मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Police Inspector Suicide : CID पुणे येथे कार्यरत पोलीस निरिक्षकाची आत्महत्या : कौटूंबिक कारणाने केली आत्महत्या

पुणे, दि.

M
mubarak

1 मिनिट वाचन

chatrapati sambhaji nagar crime news

पुणे, दि. 9 मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर)

गुन्हे अन्वेषण विभाग CID पुणे येथे कार्यरत एका पोलीस निरिक्षकाने बीड येथे रेल्वे खाली येत आत्महत्या केल्याने राज्य पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कौटूंबिक कारणाने आत्महत्या केल्याचे पत्र पोलीसांना घटना स्थळावर सापडले आहे.

पोलीस निरिक्षक सुभाष भिमराव दुधाळ, वय 42 वर्षे , पोलीस निरीक्षक EOW CID यांनी आत्महत्या केली आहे.

वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाने समाज माध्यमांवर चुकीचे मॅसेज वायरल ….

दरम्यान वरिष्ठ अधिकारी यांच्या दबावाने दुधाळ यांनी आत्महत्या केल्याचे चुकीचे मॅसेज समाज माध्यमांवर वायरल करण्यात येत आहेत. घटना स्थळावरून दुधाळ यांच्या सहिनीशी तारीख व वेळ लिहून "मी कौटूंबिक कारणाने आत्महत्या करीत आहे" असे पत्र सापडले आहे. वरिष्ठ अधिकारी यांना बदनाम करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मॅसेज वायरल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

कस्टोडियल डेथ तपास आणि कसूर…

दरम्यान एका कस्टोडियल डेथचा तपास करत असताना सपोनि यांच्या जोडीला एका पोलीस निरिक्षकाला गुंतवल्याने व तपास वरिष्ठांची परवानगी न घेता कोर्टासमोर सादर केल्याने त्यांच्यावर चौकशी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. याच दरम्यान त्यांना पुणे येथे हेडक्वार्टर नेमणूक देण्यात आली होती. १० दिवसांची रजा टाकून पोनि दूधाळ बीड येथे गेले होते. याच दरम्यान त्यांनी कौटूंबिक कारणाने आत्महत्या केली.

पोलीसांकडून कोणत्या कौटूंबिक कारणाने दुधाळ यांनी आत्महत्या केली याचा तपास केला जात आहे.

शेअर करा