PMC News : पर्यावरणीय पायाभूत सुविधांचे बळटीकरण
पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : पारदर्शक, जबाबदार आणि शाश्वत शहरी प्रशासनाप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत पुणे महापालिकेने सर्वसाधारण सभेत पर्यावरण स्थिती अहवाल २०२५-२६ सादर केला.
2 मिनिट वाचन

पुणे महापालिकेचा पर्यावरण स्थित अहवाल सादर
पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : पारदर्शक, जबाबदार आणि शाश्वत शहरी प्रशासनाप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत पुणे महापालिकेने सर्वसाधारण सभेत पर्यावरण स्थिती अहवाल २०२५-२६ सादर केला. सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क (एस.टी.पी.) या संस्थेमार्फत सादर केलेल्या अहवालात पुणे शहराने पर्यावरणीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणामध्ये उल्लेखनीय प्रगती केल्याचे नमूद केले आहे.PMC News
यंदाचा पर्यावरण स्थिती अहवाल हा पुणे महापालिकेने आजवर प्रकाशित केलेल्या सर्व अहवालांपैकी सर्वाधिक व्यापक स्वरूपाचा आहे. १८३ पानांवरून २९८ पानांपर्यंत विस्तारलेल्या या अहवालात पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वायू गुणवत्ता, शहरी वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापन अशा प्रमुख क्षेत्रांसाठी स्वतंत्र प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच भविष्यातील पर्यावरणीय नियोजन आणि धोरणनिर्मितीसाठी ६० कृतीक्षम शिफारशीही करण्यात आल्या आहेत.PMC News
जलशुद्धीकरण क्षमता वाढली
शहराची पाणी शुद्धीकरण क्षमता लक्षणीयरीत्या वाढली असून, २४x७ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्मार्ट वॉटर मीटर बसविले आहेत. नवीन व नूतनीकरण केलेल्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. वर्षभर शहराला राष्ट्रीय गुणवत्तेच्या निर्धारित निकषांनुसार पाणी पुरवल्याचे अहवालात नमूद केले आहे.
सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन
महापालिकेने सांडपाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रातही मोठी प्रगती केली असून, सध्या नऊ सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) कार्यरत आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थेचा विस्तार केला आहे. कचरा व्यवस्थापनात पुण्याने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये देशात आठवा क्रमांक पटकावला आहे. शहरात दररोज सुमारे २,७७० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, अहवाल कालावधीत जुन्या कचरा डेपोवर नव्याने कचरा टाकलेला नाही, असेही नमूद केले आहे.PMC News
हवा प्रदूषणावर उपाययोजना
गेल्या पाच वर्षात पीएम २.५ आणि नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) यांच्या पातळीत हळूहळू वाढ झाल्याचे अहवालात नमूद केले असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या उपाययोजनांचाही उल्लेख केला आहे. व्यावसायिक आस्थापनांसाठी स्वच्छ इंधनाचा सक्तीने वापर, उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी तसेच मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर-आधारित धूळ निरीक्षण प्रणाली बसविणे यांसारख्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढ
शाश्वत वाहतुकीकडे शहराची वाटचाल सुरू असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. गेल्या वर्षात शुद्ध इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत ६२ टक्क्यांची वाढ झाली आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसांची संख्या ५३५ वर पोहोचली आहे.
आपत्ती व्यवस्थापणासाठी स्वतंत्र प्रणाली
यंदाच्या पर्यावरण स्थिती अहवालात प्रथमच आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रकरण समाविष्ट केले आहे. यात चारस्तरीय पूर प्रतिसाद यंत्रणा, रिअल टाईम निरीक्षण प्रणाली आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठीची संस्थात्मक प्रणाली यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.PMC News
पुणेकरांचा प्रमुख अपेक्षा
या अहवालात शहरातील १,६०० नागरिकांच्या सहभागातून घेण्यात आलेल्या जनमत सर्वेक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील हरित क्षेत्र वाढविणे, सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे आणि कचरा व्यवस्थापन सुधारणे या बाबी पुणेकरांच्या प्रमुख पर्यावरणीय अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
वैज्ञानिक विश्लेषण आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाच्या आधारे तयार केलेला पर्यावरण स्थिती अहवाल आगामी काळात पुण्याच्या पर्यावरणीय नियोजनासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक दस्तऐवज ठरणार असल्याचा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.PMC News
पर्यावरण स्थिती अहवाल हा केवळ कायदेशीर बंधन म्हणून तयार केलेला दस्तऐवज नाही, तर तो सुशासनासाठी अत्यंत महत्वाचे साधन आहे. या अहवालाच्या माध्यमातून आम्हाला शहराच्या पर्यावरणीय कामगिरीचे पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येते. पुणे झपाट्याने विकसित होत असून, हा विकास पर्यावरणपूरक राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. वैज्ञानिक माहिती, विविध विभागांची कामगिरी आणि नागरिकांच्या सूचनांचा समन्वय साधून हा अहवाल तयार केला असून, भविष्यातील धोरणात्मक निर्णय अधिक परिणामकारक करण्यासाठी तो मार्गदर्शक ठरेल.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे मनपा PMC News
PMC News




