PMC : राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मिळविणाऱ्या महापालिकेचा फुसका बार
महाराष्ट्र मिरर PMC : पुणे महापालिकेने डिजिटल प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील मानाचा ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ सन्मान प्राप्त केला खरा.
2 मिनिट वाचन

PMC : पुणे महापालिकेचा 'डिजिटल' आव: राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार मिळाला, पण 'रोड मित्र' आणि 'जन्म-मृत्यू' दाखल्यांच्या सेवा मात्र ठप्प!
महाराष्ट्र मिरर
PMC : पुणे महापालिकेने डिजिटल प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील मानाचा ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ सन्मान प्राप्त केला खरा. पण महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ डिजिटल परिवर्तन प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. (pmc e governance award criticism)

महापालिकेच्या या डिजिटल क्रांती मध्ये ना रोड मित्र अँप चालत आहे ना, जन्म मृत्यू दाखल्याबाबत ऑनलाईन सुविधा. तर महापालिकेच्या विविध खात्यांमधील केलेल्या ऑनलाईन तक्रारी वेळेवर संबंधित खात्याकडे वेळेत पोहचत नाही. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सलग दुसऱ्यांदा समिती सदस्यांसह अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेच्या आय टी विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पुणे महापालिकेत जन्म-मृत्यू दाखल्यांमधील नाव, स्पेलिंग, जन्मतारीख, पालकांचे नाव, लिंग आदी दुरुस्तीची कामे गेल्या महिन्याभरापासून ठप्प आहे. त्यातच या महिन्यात शाळा महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना जन्म दाखले जरुरी आहेत. (PMC)
Crime News : ‘मिशन क्रॅकडाऊन’ : अवैध धंद्याना बसणार चाप
शहरात दररोज ७० ते १०० अर्ज प्रलंबित राहत असून, नावातील किंवा जन्मतारखेतील किरकोळ त्रुटी दुरुस्त न झाल्यामुळे शाळा-महाविद्यालय प्रवेश, पासपोर्ट, आधार, मतदान ओळखपत्र, बँक व्यवहार, वारसा आणि इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर व न्यायालयाच्या आदेशामुळे जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीचे अधिकार महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सॉफ्टवेअर किंवा इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करून दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात यावी अशा सूचना भिमाले यांनी दिल्या आहेत.
रोड मित्र अँपचे तीनतेरा
शहरातील विविध रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांना तक्रार करण्यासाठी रोड मित्र अँप आणला. पण अवघ्या काही दिवसात त्याचे तीनतेरा वाजले. हा अँपच सक्षमपणे चालत नाही. त्यामुळे या अँपवर ना खड्यांचे फोटो अपलोड करता येत नाही की ठीकशी तक्रार करता येत नाही. त्यामुळे या अँपचा उपयोग तरी काय. सुमारे पंधरा कोटी रुपये खर्च करून हा रोड मित्र अँप तयार करण्यात आला. पण त्याच्या साठी आवश्यक असलेले रिचार्ज सुध्दा केले।नाही, अशी १३-१४ हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या पुणे महापालिकेची अवस्था आहे.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवर महापौर यांनी ही केली होती नाराजी व्यक्त
जूनच्या पहिल्या आठवड्यात शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यावेळी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची ( आय टी विभागातील) प्रणालीची पाहणी महापौर मंजुषा नागपुरे यांनी केली होती. त्यावेळी या विभागात असलेल्या टी व्ही स्क्रीनवर एकाच ठिकाणची वर्दळ दिसत होती. केवळ एकच फोन चालू, सहा नंतर च ढिसाळ कारभार यावर महापौर यांनी नाराजी व्यक्त करत ही यंत्रणा सुधारण्याचे आदेश दिले होते.

PMC : छत्रपती शिवाजीनगर परिसरातील सुमारे तीन हजार घरांना गढूळ पाण्याचा पुरवठा
मात्र राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ प्राप्त करणारे महापालिका प्रशासन आपल्या त्रुटींकडे किती दुर्लक्ष करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)




