Crime News : ‘मिशन क्रॅकडाऊन’ : अवैध धंद्याना बसणार चाप
परिमंडळ-७ मध्ये विविध ठिकाणी कारवाया; सहा संशयित ताब्यात; ३२ हजार ४१० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
2 मिनिट वाचन

परिमंडळ-७ मध्ये विविध ठिकाणी कारवाया; सहा संशयित ताब्यात; ३२ हजार ४१० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘मिशन क्रॅकडाऊन‘ या विशेष मोहिमेचा प्रारंभ केला आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे शहरातील अवैध धंद्याना आळा घालण्याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जाणार आहे. दरम्यान, या मोहिमेअंतर्गत तीन ठिकाणी कारवाया करण्यात येउन, एकूण ३२ हजार ४१० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येउन सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांना दणका बसला आहे.Crime News

पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस उपायुक्त, परिमंडळ -७ यांच्या नेतृत्वाखाली, परिमंडळ-७ च्या कार्यक्षेत्रात ‘मिशन क्रॅकडाऊन‘ या विशेष मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही मोहीम प्रामुख्याने शहरातील अवैध दारू विक्री, मटका जुगार, अंमली पदार्थ, अवैध शस्त्रे आणि संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबवली जाणार आहे.Crime News
“गुन्हेगारांना कायद्याची भीती आणि नागरिकांना सुरक्षिततेची खात्री” देणे हा या मोहिमेचा विशेष उद्देश आहे. या मोहिमेसाठी परिमंडळ-७ अंतर्गत दोन विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. जी मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरात सातत्याने धाडी टाकून बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश करणार असून, गुन्हेगारांवर वचक ठेवणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात पोलिसांनी कारवाईचा धडका लावला आहे.Crime News

करण्यात आलेल्या कारवाया -
‘मिशन क्रॅकडाऊन‘ या विशेष मोहिमेअंतर्गत लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि.१५) विशेष कारवाया करण्यात आल्या. या कारवाईमध्ये अनेक अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आल्या आहेत. मौजे आळी येथील हॉटेल ब्ल्यू डायमंडमध्ये दुपारी सव्वा बारा वाजता पोलिस पथकाने छापा टाकून ७,९९० रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा आणि दोन हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या कारवाईत हॉटेल चालक हनुमंता शिवलिंगप्पा शिंदे (वय २२) याच्यासह हॉटेल मालक सुरज गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Crime News
दुसरी कारवाई हॉटेल राजरत्न येथे करण्यात आली. या कारवाईत चार हजार पाच रूपयांचा मद्यसाठी आणि ११ हजार ५३० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी चालक संकेत भारत घोडके (वय २८) आणि मालक सुहास प्रवीण मोडक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या कारवाई दरम्यान दुपारी दोन वाजता मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये यशस्वी हॉटेलच्या मागील पत्र्याच्या शेडवर टाकलेल्या धाडीत तीन मटका रायटर्ससह भाऊसाहेब गोपीनाथ रागपसरे यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत १०हजार ८९० रुपयांची रोख रक्कम, मटका साहित्य, पावती पुस्तके आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.Crime News
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ कराड, पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड यांच्यासह बेंद्रे, साबळे, इथापे, पुंडे, चिनके, सरतापे यांच्या पथकाने केली. या प्रकरणांचा लोहगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.
अवैध धंद्याची माहिती द्यावी
लोहगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोठेही अवैध दारू विक्री, मटका, जुगार, अंमली पदार्थ किंवा इतर कोणतीही गुन्हेगारी स्वरूपाची हालचाल निदर्शनास येत असेल, तर त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन परिमंडळ-७ च्या पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Crime News




