मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : हत्येच्या गुन्ह्यात एचआयव्ही बाधित ५२ वर्षीय महिलेला जामीन

Pune Crime : पिंपरी: सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी महिला सेल्वराज राजंगम यांना पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

हत्येच्या गुन्ह्यात एचआयव्ही बाधित ५२ वर्षीय महिलेला जामीन पिंपरी-चिंचवड अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
हत्येच्या गुन्ह्यात एचआयव्ही बाधित ५२ वर्षीय महिलेला जामीन पिंपरी-चिंचवड अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

Pune Crime : पिंपरी-चिंचवड अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

Pune Crime : पिंपरी: सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी महिला सेल्वराज राजंगम यांना पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपीने अॅड. प्रसाद विराज निकम व अॅड. मन्सूर तांबोळी यांच्या मार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.https://maharashtramirror.com/ Pune Crime

आरोपीविरुद्ध सांगवी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५(४) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभियोजनाच्या कथनानुसार, २८ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मृत व्यक्तीसोबत सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादातून तसेच सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे आरोपीने दगड व लोखंडी विळ्याने हल्ला केल्याचा आरोप होता.https://maharashtramirror.com/ Pune Crime

आरोपीने त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन शस्त्रासह आत्मसमर्पण केले होते.

आरोपीच्या वतीने अॅड. प्रसाद विराज निकम यांच्याकडून मांडण्यात आलेल्या युक्तिवादानुसार, आरोपी ५२ वर्षांची महिला असून ती एचआयव्ही संबंधित आरोग्य समस्यांनी त्रस्त आहे आणि तिला नियमित वैद्यकीय उपचार व देखभालीची आवश्यकता आहे. घटनेपूर्वी मृत व्यक्तीकडून सातत्याने त्रास, शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याचे तसेच घटनेच्या वेळी स्वतःवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आरोपीने स्वतःच्या संरक्षणासाठी कृती केली असून खून करण्याचा पूर्वनियोजित हेतू नव्हता, तसेच खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा अतिरेक झाला की नाही, हा मुद्दा पुराव्यानंतरच निश्चित होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला.

अॅड. प्रसाद विराज निकम यांच्याकडून पुढे असेही निदर्शनास आणून देण्यात आले की, आरोपीने स्वेच्छेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून तपासात सहकार्य केले आहे. तिच्याकडून आवश्यक ती शस्त्राची जप्ती झालेली असून पुढील कोणतीही महत्त्वाची जप्ती किंवा शोध बाकी नसल्याचे आणि तपास जवळपास पूर्ण झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. तसेच आरोपीला कोणतेही पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचेही नमूद करण्यात आले.

अभियोजन पक्षाने जामिनास विरोध करताना खाजगी संरक्षणाचा अधिकार आरोपीने ओलांडल्याचा दावा केला. तसेच मालमत्तेचा वाद अद्याप सुरू असल्याने भविष्यातील वादाची शक्यता आणि आरोपीकडून साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले. आरोपीच्या आरोग्यासंदर्भात कारागृह प्रशासनाकडून आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जातील, असा युक्तिवादही करण्यात आला.

न्यायालयाने आदेशात नमूद केले की, आरोपी एचआयव्ही बाधित असल्याचे व तिच्या वैद्यकीय स्थितीबाबतचे अहवाल रेकॉर्डवर असल्याचे निर्विवाद आहे. आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केले असून शस्त्र आधीच जप्त झाले आहे. तसेच तपास बर्‍याच अंशी पूर्ण झाला असून तो अंतिम टप्प्यात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. आरोपीची वैद्यकीय स्थिती, तिने भोगलेला कोठडीतील कालावधी आणि तपासाची सद्यस्थिती विचारात घेऊन न्यायालयाने जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला.

न्यायालयाने आरोपीस रु. २५,००० च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व त्याच रकमेच्या एका जामीनदाराच्या हमीवर मुक्त करण्याचे आदेश दिले. तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे आणि कोणत्याही प्रकारे साक्षीदारांवर दबाव न आणणे, राहत्या पत्त्याची माहिती देणे आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय निवासस्थान न बदलणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत अॅड. प्रसाद विराज निकम यांना अॅड. पृथ्वीजित माने, अॅड. शिवानी वाघमारे, अॅड. श्रुती फडे, अॅड. पूनम कोळेकर व अॅड. समीक्षा शेळके यांनी सहकार्य केले सदर आदेश एस. एस. नायर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पिंपरी-चिंचवड, पुणे यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी खुल्या न्यायालयात उच्चारित केला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा