Pune Crime : व्यावसायिकाकडे मागितली पाच कोटींची खंडणी
व्यावसायिकाकडे मागितली पाच कोटींची खंडणी
1 मिनिट वाचन

Pune Crime : पिंपरी येथील जयहिंद शाळेसमोरील कार्यालयातील घटना

Pune Crime : पिंपरी, महाराष्ट्र मिरर : पिंपरी येथील जयहिंद शाळेसमोरील कार्यालयात एका ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकाला डांबून पाच कोटींची खंडणी मागितली गेली. ही घटना २७ जानेवारी रोजी दुपारी साडेबार ते दोन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी महेंद्र रामकरणदास अगरवाल (६२, दुरानी कॉलनी, मार्केटयार्ड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अमर मुलचंदाणी, नरेंद्र यादव, महादेव साबळे, सुनील डोंगरे, इतर तीन ते चार अनोळखी व्यक्ती आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अमर मुलचंदानी यांनी फिर्यादी अगरवाल यांना 'मी तुला खूप मदत केली आहे. माझ्या घरावर ईडीची जप्ती कारवाई होणार आहे. ईडीला पैसे दिले नाही तर मी रस्त्यावर येईन. माझे कुटुंब उध्वस्त होईल' असे सांगितले. अगरवाल यांनी पैसे देण्यास नकार दिला असता अमर मुलचंदानी आणि इतर लोकांनी अगरवाल यांना मारहाण करून थर मारण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची मागणी केली. तीन चेक व एक प्रतिज्ञापत्र घेऊन ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.




