मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pen Railway Station : गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी दिलेल्या निवेदनाला यश

गडब : पेण तालुक्यातील Pen Taluka गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व पेण डेपो इन्चार्ज अपर्णा वर्तक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते .

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pen Railway Station : गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी दिलेल्या निवेदनाला यश

गडब : पेण तालुक्यातील Pen Taluka गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व पेण डेपो इन्चार्ज अपर्णा वर्तक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते . सदर निवेदन प्रवासी "रजादिन" याचे अवचित्य साधून सदर निवेदन गडब गावातील पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षा व युवा ग्रामीण पत्रकार संघ रायगड महिला अध्यक्षा सौ. अवंतिका सुरेश म्हात्रे व रायगडची शानचे संपादक सुरेश म्हात्रे यांनी पेण विभाग नियंत्रक यांना देण्यात आले होते .

सदर निवेदनात पेण तालुक्यातील गडब गावातील कामगार वर्ग व विद्यार्थी व इतर प्रवासी वर्ग यांना समस्या भेडसावत होती. त्यामुळे लोकांची गैरसोय लक्षात घेता हे निवेदन सौ . म्हात्रे यांनी दिले होते .

यासंदर्भात पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व अपर्णा वर्तक यांच्याशी गेली दोन महिने अर्जाचा पाठपुरावा केला व वेळोवेळी स्वतः भेटून व दुरध्वनीवरून संपर्क साधला असता अखेर विभाग नियंत्रकांनी अर्जाची दखल घेत सदर समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या जातील व प्रवास्यांचे समाधान होईल असे म्हात्रे यांच्याशी वेळोवेळी बोलताना सांगीतले . त्या अनुषंघाने गडब गावाठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्या संदर्भातील फलक पेण तालुका राषद्वादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ अवंतिका म्हात्रे व सुरेश म्हात्रे यांना फलक सुपुर्द करण्यात आले .

सध्या गडब येथील रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याने लवकरच हे नामफलक त्यावण्यात येणार असल्याचे सौ म्हात्रे यांनी सांगीतले

हेही वाचा: Coastal Road Accident : हिरे व्यावसायिकाच्या बीएमडब्ल्यूने कोस्टल रोडवर काम करणाऱ्या मजुराला चिरडले.

शेअर करा