मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

PCMC News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pimpri Chinchwad: सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये फेरबदल

DO
Dhanshree Otari

1 मिनिट वाचन

pimpri-chinchwad police
pimpri-chinchwad police

Pimpri Chinchwad: सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये फेरबदल

महाराष्ट्र मिरर, पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस (Pimpri Chinchwad ) आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार नव्याने बदलीवर आणि पदोन्नतीवर हजर झालेल्या अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विविध विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत या नियुक्त्या लागू राहणार आहेत. (PCMC News Transfers of officers within the Pimpri Chinchwad Police Commissionerate)

Crime News: तीन गावठी पिस्तुलांसह आरोपी जेरबंद; अवैध दारूविरोधातही धडक कारवाई

पोलिस आयुक्तालय मंजूर झाल्यानंतर प्रथमच शहरासाठी दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी आठ सहाय्यक आयुक्त संपूर्ण कारभार सांभाळत होते. आता ही संख्या वाढून सोळा झाली आहे.

CRIME NEWS : दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक

नव्या आदेशानुसार निलेश विश्वासराव देशमुख यांची वाहतूक शाखेत, सुदर्शन साईदास राठोड यांची गुन्हे-१ शाखेत, प्रशांत बाबासो ढोले यांची पिंपरी विभागात, प्रिया देविदास ढमाळे यांची महाळुंगे विभागात, तर मनीषा विश्वंभर कदम यांची सांगवी विभागात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad Police ACP Appointments and Transfers)

पदोन्नतीवर हजर झालेले सुनील पांडुरंग पंधरकर यांच्याकडे विशेष शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच रोहिणी ज्ञानदेव बाणकर यांची सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

https://english.maharashtramirror.com/ketan-agrawal-murder-case-siyas-lawyer-sends-%e2%82%b910-crore-defamation-notice-to-her-brother/

सचिन तुकाराम कदम यांची महाळुंगे विभागातून गुन्हे-२ शाखेत, प्रवीण बाळासाहेब मोरे यांची गुन्हे-२ मधून देहूरोड विभागात, तर विठ्ठल खंडुजी कुबडे यांची पिंपरी विभागातून हिंजवडी विभागात बदली करण्यात आली आहे.
संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने हजर होऊन कार्यभार स्वीकारावा तसेच अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शेअर करा