मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Political News : पनवेलमध्ये मतदानाआधीच 'कमळ' फुलले! 8 नगरसेवक बिनविरोध विजयी; महाविकास आघाडीला जोरदार धक्का

•नितीन पाटलांनी उघडले खाते; शेकाप, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या माघारीमुळे भाजपची निवडणुकीपूर्वीच मोठी 'बाजी'

V
Vivek

1 मिनिट वाचन

BJP

•नितीन पाटलांनी उघडले खाते; शेकाप, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या माघारीमुळे भाजपची निवडणुकीपूर्वीच मोठी 'बाजी'

पनवेल | पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने विजयाचा गुलाल उधळला आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे महाविकास आघाडी आणि विशेषतः शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नितीन पाटील ठरले पहिले 'बिनविरोध' नगरसेवक

भाजपच्या या विजयाची नांदी रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी केली. प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून ते निवडणूक लढवत होते. या प्रभागातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव बाद झाला. प्रतिस्पर्धी उमेदवारच रिंगणात नसल्याने नितीन पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

अर्ज माघारीचे सत्र आणि 8 जागांचा आकडा

आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी आपली शस्त्रे म्यान केली. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 7 जागांवर भाजपचा मार्ग मोकळा झाला. परिणामी, पनवेल महापालिकेत महायुतीचे 8 नगरसेवक आता अधिकृतपणे सभागृहात जाणार आहेत.

बिनविरोध निवडून आलेले भाजपचे 'विजेते'

१) नितीन पाटील
२) रुचिता लोंढे
३) अजय बहिरा
४) दर्शना भोईर
५) प्रियंका कांडपिळे
६) ममता प्रितम म्हात्रे
७) स्नेहल ढमाले

हेही वाचा: Nagpur News : नागपुरात अजब राडा! अपक्ष उमेदवाराला मतदारांनीच घरात कोंडले; 'माघार घ्यायची नाही' म्हणत समर्थकांचा घराला बाहेरून कुलूप

शेअर करा