मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : पंचायतन मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा "सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती"

पनवेल जितिन शेट्टी : जे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : पंचायतन मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा "सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती"

पनवेल जितिन शेट्टी : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या नढाळ येथील श्रीक्षेत्र पंचायतन मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. पनवेलचे मा.आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर, नढाळ वाडी, चौक येथे १३ मे २०२२ रोजी या मंदिरांचा भव्यदिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा करून स्थापना करण्यात आली होती. श्री.मयुरेश्वर गणेश, संकटमोचन श्री.हनुमान, श्री.साईबाबा, श्री.भवानी माता आणि नढाळेश्वर महादेव या पाच मंदीरांचे "भव्य-दिव्य" असे आध्यात्मिक संकुल उभारण्यात आले आहे. यावर्षी मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हरिपाठ, श्रीं ची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा, संगीत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार श्री.अण्णासाहेब बनसोडे, लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल पंचायत समिती माजी सभापती काशिनाथ पाटील, कृ.ऊ.बा.स. समिती सभापती नारायण शेठ घरत, भाजपा ज्येष्ठ नेते नंदकुमार पटवर्धन, खालापूर नगराध्यक्ष सौ.शिवानी जंगम, शेकाप खालापूर तालुका चिटणीस संतोष जंगम, माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट-
"पायी दिंडी चालत जाणाऱ्या सर्व भक्तांसाठी सभागृहात राहण्याची मोफत सेवा देण्यात येते. भक्तांसाठी अत्यल्प दरात भक्त निवासाची व्यवस्था या ठिकाणी आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत चहा-पाणी ही अन्न सेवा संस्थेच्या माध्यमातून देण्यात येते. सांप्रदायिक, भजन कीर्तन कार्यक्रमासाठी मोफत सभागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. शैक्षणिक सेवेच्या दृष्टीने परिसरातील हिमांशू दिलीप पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मधून अत्यल्प दरात इंग्रजी माध्यमाची शिक्षण सेवा देण्यात येते. शाळेमध्ये पालक नसणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सेवा आणि आवश्यक ते सहकार्य अशाप्रकारे विविध सुविधा श्री क्षेत्र पंचायतन मंदिराच्या परिसरातून देण्यात येतात."

  • प्रितम जनार्दन म्हात्रे,
    अध्यक्ष, जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था.
  • शेअर करा