मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील अतिक्रमणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक

पनवेल : पनवेल शहरातील टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तेथील सुरक्षा रक्षकांनीच अतिक्रमण केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संताप व्यक्त करून आज संतप्त शिवसैनिकांनी तेथे जावून ते अतिक्रमण हटविले आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील अतिक्रमणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक

पनवेल : पनवेल शहरातील टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तेथील सुरक्षा रक्षकांनीच अतिक्रमण केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संताप व्यक्त करून आज संतप्त शिवसैनिकांनी तेथे जावून ते अतिक्रमण हटविले आहे. यातूनच पनवेल महापालिकेचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.

दोन दिवसापूर्वीच शहरातील महापुरुषाची विटंबना केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुद्धा तेथील सुरक्षा रक्षकाचा हयगयीपणा समोर आला होता. असे असतानाच शहरातील टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असणार्‍या सुरक्षा रक्षकानेच त्या पुतळ्याजवळ चौथर्‍यावर खुर्च्या टाकून आडोसा करून तेथे बेकायदेशीर पंखे लावून पाय लांब करून आराम करत असत. ही बाब पनवेल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या लक्षात येताच त्यांच्यासह शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहरप्रमुख कुणाल कुरघोडे, प्रदीप माखीचा, मयुरेश पाटील, साईसूरज पवार, अनिल खुंटले, ठाकूर आदी शिवसैनिकांनी धाव घेवून याबाबत तेथील सुरक्षा रक्षकांना जाब विचारला व तेथील अतिक्रमण काढले. त्याचप्रमाणे तेथील ठेकेदाराला तात्काळ बोलावून घेवून 4 दिवसात या सुरक्षा रक्षकांसाठी वेगळी केबिन बाजूला उभारावी असा दमच दिला व यापुढे अशा प्रकारे महापुरुषांच्या पुतळ्याबाबत गलथान कारभार केल्यास तो शिवसेना कदापी सहन करणार नाही, असा सज्जड दमच शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी यावेळी पनवेल महापालिकेला दिला आहे.

हेही वाचा: Forex' Fraud : 7 कोटींच्या 'फॉरेक्स' फसवणुकीचा मास्टरमाइंड अखेर जेरबंद!

शेअर करा