मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : अनधिकृत फेरीवाल्यांवर, व्यवसायिकांवर महापालिकेची तोडक कारवाई

पनवेल : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर , फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी तोडक कारवाई तीव्र करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : अनधिकृत फेरीवाल्यांवर, व्यवसायिकांवर महापालिकेची तोडक कारवाई

पनवेल : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर , फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी तोडक कारवाई तीव्र करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानूसार आज चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई करण्यात आली.

खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरांमध्ये अनधिकृतपणे रस्त्यांवर , फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर, खाद्य व्यवसायिकांवर अतिक्रमण कारवाई करणाऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. तसेच प्रभाग समिती कामोठे अंतर्गत आठवडा बाजार , हातगाड्या फुटपाथवर करवाई करणेत आली.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

प्रभाग समिती अ उपविभाग नावडे अंतर्गत घोट येथील अनाधिकृत बाजांरांवर कारवाई करून सामान जप्त करण्यात आले व बाजार बंद करण्यात आला. या कारवाईवेळी प्रभाग अधिकारी तथा साहय्यक आयुक्त स्मिता काळे प्रभारी अधीक्षक अमर पाटील उपस्थित होते.

याबरोबरच कळंबोली शहरामधील रस्यांितवर, फूटपाथवर, अतिक्रमण केलेल्या व्यवसायिकांवर कारवाई अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई करून सामान जप्त केले.तसेच पनवेलमधील शहरातील रस्त्यांवरती आणि फूटपाथवरती अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: Jalna Bribe News : फेर दुरुस्तीबाबत आदेश काढण्यासाठी 20 हजाराची लाच घेणारा इंदेवाडी जालन्याचा तलाठी पवार ACBच्या जाळ्यात

शेअर करा