मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : महापालिकेच्यावतीने प्रदूषण विरहित व फटाके मुक्त दिवाळी विषयावर परिसंवाद

पनवेल : आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका आयोजित माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत 'ग्रीन फेस्टिवल' या विषयांतर्गत"प्रदूषण मुक्त दिवाळी " ह्या विषयावर आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी पिल्लई काॅलेज ऑफ आर्ट्स ,काॅमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

यावेळी पिल्लई काॅलेज ऑफ आर्ट्स ,काॅमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गजानन वाडेर, बी. काॅम विभागाच्या समन्वयक प्राध्यापक डॉ. किरण देशमुख तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत उपायुक्त डॉ. वैभव विधाते ह्यांनी दिलेल्या सूचनेनूसार हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रदूषणाचे परिणाम, पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच फटाकेमुक्त दिवाळी, ग्रीन फेस्टिवल आणि प्रदूषण मुक्त दिवाळी चे बॅनर बनवून जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी माझी वसुंधराची प्रतिज्ञा घेण्यात आली.

हेही वाचा: Eknath Shinde : "माझी माती माझी माणसं.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावातील आजींशी साधला संवाद

शेअर करा