मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : पनवेल महानगरपालिकेच्या ड विभागात अनधिकृत बांधकामांना अधिकाऱ्यांचे अभय?

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या Panvel Muncipal Corporation ड विभागात अनधिकृत बांधकामांना थेट अभय मिळत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : पनवेल महानगरपालिकेच्या ड विभागात अनधिकृत बांधकामांना अधिकाऱ्यांचे अभय?

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या Panvel Muncipal Corporation ड विभागात अनधिकृत बांधकामांना थेट अभय मिळत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीतील हॉटेल सागर पॅलेसला लागून असलेल्या कुसुम ट्रॅव्हल या एअर कंडीशन बुकिंग ऑफिसने नियमबाह्यपणे जी जी भिंत उभारली आहे. या भिंतीची उंची पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे.

याच परिसरात युनियन बँकेला लागून असलेले मोबाईल दुकानही अनधिकृतपणे उभारले गेले आहे. स्थानिकांनी या बांधकामांविरोधात तक्रारी नोंदवल्या असूनही, पालिका अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे ड विभागातील अधिकाऱ्यांचे धनदांडग्यांशी काही हितसंबंध असल्याचा संशय नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

"आम्ही वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी केल्या, पण प्रत्येक वेळी आमच्या अर्जांकडे दुर्लक्ष केले जाते. धनदांडग्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई का होत नाही?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या या निष्क्रियतेमुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

ड विभागातील अधिकारी या अनधिकृत बांधकामांवर कधी कारवाई करणार, की धनदांडग्यांना पाठिशी घालणे सुरूच राहणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागरिकांना आता पालिकेच्या कारवाईची प्रतीक्षा आहे, पण जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत हा वाद कायम राहण्याची शक्यता आहे.

शेअर करा