मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : पनवेल, तक्का येथील प्रवेशद्वाराजवळील गटारावर विनापरवानगी बांधलेल्या मटणाच्या दुकानांवर अधिकारी मेहेरबान

•मटणाच्या अनधिकृत दुकानावर पालिकेचा हातोडा?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : पनवेल, तक्का येथील प्रवेशद्वाराजवळील गटारावर विनापरवानगी बांधलेल्या मटणाच्या दुकानांवर अधिकारी मेहेरबान

•मटणाच्या अनधिकृत दुकानावर पालिकेचा हातोडा?

पनवेल जितिन शेट्टी : महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती "ड" अंतर्गत, तक्का गावाच्या प्रवेशद्वाराजवळ, दोन मटण दुकानदारांनी अत्यंत बेजबाबदारपणे आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आपल्या दुकानांचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम केवळ अनधिकृतच नाही, तर थेट गटारावरच करण्यात आले आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे. या ठिकाणी उघड्यावर, अस्वच्छ जागी मटण विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

गटारातील दुर्गंधी, माश्या, कीटक आणि इतर जंतुंमुळे हे मटण दूषित होण्याची दाट शक्यता आहे. असे दूषित मटण खाल्ल्याने नागरिकांना अनेक प्रकारचे आजार होऊ‌ शकतात, विषबाधा होऊ शकते आणि साथीचे रोग देखील पसरू शकतात. या दुकानांचा केवळ आरोग्यावरच दुष्परिणाम होत नाही, तर या अनधिकृत बांधकामामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रवेशद्वाराजवळच असलेल्या या दुकानांमुळे वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होतो. या हे सर्व पाहता, या मटण दुकानदारांनी केवळ महानगरपालिकेच्या बांधकाम
नियमांचेच उल्लंघन केलेले नाही. तर त्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी देखील खेळ मांडला आहे.या दुकानांचे शेडचे बांधकाम देखील पूर्णपणे अनधिकृत आहे या दोन्ही मटण दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

गटारावरील हे अनधिकृत बांधकाम त्वरित तोडून टाकण्यात यावे. या दुकानदारांना उघड्यावर, अस्वच्छ ठिकाणी मटण विक्री करण्यास मज्जाव करण्यात यावा. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून या परिसरात नियमितपणे तपासणी करण्यात यावी.अशी माहिती युवा ग्रामीण पत्रकार संघ पनवेल तालुका अध्यक्ष जितिन शेट्टी यांनी दिली. आयुक्त मंगेश चितळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने योग्य ती पावले उचलतील अशी अपेक्षा युवा ग्रामीण पत्रकार संघ पनवेल तालुका अध्यक्ष जितिन शेट्टी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Sunday Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ; रविवारी (23 फेब्रुवारी) रेल्वेचा मेगाब्लॉक!

शेअर करा